आर.टी.ई. प्रवेश २०२४-२५ साठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू, पहा वयोमर्यादा, कागदपत्रे, अर्ज कसा व कुठे करावा ? RTE Admission Maharashtra 2024-25.
RTE Admission 2024-25 Maharashtra :
नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, RTE 2024-25 अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आर. टी. ई. प्रवेश प्रक्रिये अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची मुदत १६ एप्रिल २०२४पासून ३० एप्रिल २०२४ (नवीन अंतिम तारीख 31 मे 2024 ) पर्यंत आहे. ज्या पालकांना महाराष्ट्रातून आर.टी.ई. अंतर्गत मोफत शिक्षणासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश करावयाचा आहे. तर त्यासाठी असणाऱ्या अट व नियम, त्यासाठी लागणारी वयोमर्यादा, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज कुठे करावा, कसा करावा?, त्यासाठी लागणारी योग्यता, अशी सर्व माहिती या लेखात तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही हा पूर्ण लेख वाचा व इतरांनाही शेअर करायला विसरू नका.
RTE Admission Maharashtra 2024-25
RTE(Right to Education Act 2009) :
हा शिक्षण हक्क कायदा भारतीय संसदेने ४ ऑगस्ट २००९ रोजी संपूर्ण भारतात लागू केला आणि १ एप्रिल २०१० पासून हा कायदा अंमलात आणण्यात आला. बालकांना उत्तम दर्जाचे प्राथमिक शिक्षण मिळावे हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे. यामध्ये शाळांनी २५% जागा या राखीव ठेवलेल्या असतात, त्याअंतर्गत १ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण मोफत केले जाते.
RTE 2024 -25 अंतर्गत प्रवेशासाठी पात्रता :
RTE 2024 -25 Maharashtra Eligibility :
१. विद्यार्थ्यांचे एल.के.जी. प्रवेशासाठीचे किमान वय जन्म प्रमाणपत्राद्वारे निश्चित केले जाईल.
२. या कायद्याअंतर्गत सर्व पात्र शाळांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी २५% जागा राखीव ठेवणे बंधनकारक असेल.
३. ज्या कुटुंबाची वार्षिक कमाई रु. १. लाख व त्यापेक्षा कमी आहे, ते या कायद्याअंतर्गत अर्ज करू शकतात.
४. अपंग, अनाथ, विशेष गरज असलेली, कामगार व मजुरांची मुले या कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पात्र आहे.
RTE 2024 -25 अंतर्गत प्रवेशासाठी वयोमर्यादा :
RTE 2024 -25 Maharashtra Age Limit:
अ. क्र. | प्रवेशाचा वर्ग | वयोमर्यादा | दि ३१ डिसेंबर 2024 रोजीचे किमान वय | दि ३१ डिसेंबर 2024 रोजीचे कमाल वय |
1. | प्ले ग्रुप / नर्सरी | 1 जुलै 2020 – 31 डिसेंबर 2021 | 3 वर्ष | 4 वर्ष 5 महिने 30 दिवस |
2. | ज्युनियर केजी | 1 जुलै 2019 – 31 डिसेंबर 2020 | 4 वर्ष | 5 वर्ष 5 महिने 30 दिवस |
3. | सिनियर केजी | 1 जुलै 2018 – 31 डिसेंबर 2019 | 5 वर्ष | 6 वर्ष 5 महिने 30 दिवस |
4. | इयत्ता १ ली | 1 जुलै 2017 – 31 डिसेंबर 2018 | 6 वर्ष | 7 वर्ष 5 महिने 30 दिवस |
वयोमार्यादा संबंधित जीआर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
RTE 2024 -25 अंतर्गत प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे :
RTE 2024 -25 Maharashtra Documents:
१. पाल्य व पालक दोघांचेही आधारकार्ड.
२. पाल्याचे जन्म प्रमाणपत्र .
३.पत्त्याचा पुरावा.
४. उत्पन्नाचा दाखला (असल्यास ).
५. जात प्रमाणपत्र (SC/ST प्रवर्गासाठी )
६. अपंग असल्याचे प्रमाणपत्र. (असल्यास ).
सर्व कागदपत्रांची यादी.
RTE 2024 -25 अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज कसा करावा ?
सर्वात प्रथम तुम्हाला RTE 2024- 25 अंतर्गत प्रवेशासाठी पुढील वेबसाईट वर लॉगिन करावे लागेल.
https://student.maharashtra.gov.in
अर्ज भरण्याची योग्य पद्धत बघण्यासाठी खालील विडिओ बघा.
RTE अंतर्गत लकी ड्रॉ सोडत आता 18 जून 2024 ला जाहीर होण्याची शक्यता. यासाठी आपल्याला https://student.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर लॉग इन करावे लागेल. आपला Application No. व Password टाकल्या नंतर आपले Account ओपन होईल व आपल्या पाल्याच्या प्रवेशा बाबतची माहिती तेथे दिसेल.
RTE Admission for Maharashtra 2024-25 is now open. To apply, visit the following website: [https://student.maharashtra.gov.in](https://student.maharashtra.gov.in).
For instructions on how to fill out the application, please watch the video provided.
आरटीई २५% प्रवेश प्रक्रीया सन २०२४-२५ करिता पालकांसाठी सूचना Age Rule 2024-25 RTE २५% ऍडमिशन साठी पालकांकरीता सूचना: Click Here to download Admission Schedule Click Here School Education and Sports Department (maharashtra.gov.in) RTE 25% Video Click Here School Education and Sports Department (maharashtra.gov.in) For Online Application Click Here School Education and Sports Department (maharashtra.gov.in) |
Select (2024) महाराष्ट्र लेक लाडकी योजना, Maharashtra Lek Ladaki Yojana 2024.आता एक मुलगी असेल तर मिळणार 1 लाख 1 हजार रुपये, त्वरित अर्ज करा ..! | (2024) महाराष्ट्र लेक लाडकी योजना, Maharashtra Lek Ladaki Yojana 2024.आता एक मुलगी असेल तर मिळणार 1 लाख 1 हजार रुपये, त्वरित अर्ज करा ..! |
---|
No.1 Health Tips For Summer, उन्हाळ्यातील खाद्यपदार्थ : काय खावे आणि काय खाऊ नये.
Best Agri Business Ideas, पशुखाद्य निर्मिती उद्योग कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Select T20 World Cup साठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा. या दिवशी होणार दिल्लीत बैठक. | T20 World Cup साठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा. या दिवशी होणार दिल्लीत बैठक. |
---|