Maharashtra Lek Ladaki Yojana
‘लेक लाडकी योजना 2024’, महाराष्ट्र लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, याचा लाभ कसा घेता येईल, यासाठी अर्ज कसा व कुठे करावा, यासाठी काय अटी आहेत, फॉर्म भरण्यासाठी कोणाला संपर्क करावा. या सर्व माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
महाराष्ट्र शासनाच्या ‘ माझी कन्या भाग्यश्री ‘ या योजनेला मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे, तिच्यात सुधारणा करून ‘लेक लाडकी योजना ‘ या योजनेची १ एप्रिल २०२३ पासून सुरुवात करण्यात आली.
Maharashtra Lek Ladaki Yojana योजनेचा उद्देश:
१. राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.
२. मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
३. मुलींचा मृत्युदर कमी करणे.
४. बालविवाह रोखाने.
५. कुपोषण कमी करणे.
६. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
मुलींच्या सक्षमीकरनासाठी 1 एप्रिल 2023 पासून, लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आली. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येईल व मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला रोख 75000 रुपये देण्यात येतील.
सदर योजनेअंतर्गत काही अटी शर्ती व आवश्यक कागदपत्राच्या आधारे पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पाहिलीत असताना ६ हजार रुपये, सहावीत असताना ७ हजार रुपये,अकारावीत ८ हजार रुपये व वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार अशी एकूण १ लाख १ हजार एवढी रक्कम देण्यात येईल.
अटी व शर्ती :
१. ही योजना पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींसाठी असून, दिनांक १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी लागू असेल.
२.कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.(पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्ता व दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्ता मिळताना .)
३. दुसऱ्या प्रसूतिवेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास, एक किंवा दोनही मुलींना लाभ मिळेल. पण त्यानंतर कुटुंब नियोजन शश्रक्रिया करणे आवश्यक राहील.
४. दिनांक १ एप्रिल पूर्वी एखादे अपत्य आहे व त्यानंतर जन्मलेल्या दुसऱ्या किंवा जुळ्या मुलींसाठी ही योजना लागू असेल.
५. लाभार्थी महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
६. राष्ट्रीयकृत बँक खाते आवश्यक आहे.
७. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे :
Lek Ladki Yojana 2024 Documents
१. जन्माचा दाखला.
२. तहसीलदार / सक्षम अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला.
३. आधारकार्ड (दूसरा हप्ता मिळताना आवश्यक)
४. पालकाचे आधारकार्ड.
५. बँक पासबूक झेरॉक्स.
६. रेशनकार्ड झेरॉक्स.
७. मतदान ओळखपत्र(शेवटच्या लाभासाठी, मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला.)
८. कुटुंब नियोजन शश्रक्रिया प्रमाणपत्र.
९. अंतिम लाभाकरीता, मुलगी अविवाहित असल्याचे स्वयंघोषणपत्र.
राज्य शासनाचा GR बघण्यासाठी, क्लिक करा.
Lek Ladki Yojana 2024 Application Form.
Lek Ladki Yojana 2024 form pdf
(2024) महाराष्ट्र लेक लाडकी योजना
महिला व मुलींसाठी असणाऱ्या इतर योजना :
१. बेटी बचाओ बेटी पढाओ.
केंद्र शासनाने 'बेटी बचाओ बेटी पढाओ ' या अभियानाची सुरुवात २१ फेब्रुवारी २०१५ पासून मुलींचा जन्मदर कमी असलेल्या १०० जिल्ह्यामध्ये केलेली आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा.
२. महिला उद्योगिनी योजना.
महाराष्ट्रातील हि एक कर्ज योजना असून, व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, स्वयंरोजगारासाठी महिलांना जास्तीत जास्त ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
अधिक माहितीसाठी क्लिक करा.
३. महिला स्वर्णीम योजना.
हि योजना महाराष्ट्र्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत मागासवर्गीय उद्योजक महिलांकरिता राबविली जाते. या योजनेद्वारे नॅशनल बॅकवॉर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन मार्फत २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अतिशय कमी दारात उपलब्ध करून दिले जाते.
अधिक माहितीसाठी क्लिक करा.
४. महिला सन्मान योजना.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासासाठी हि योजना तयार करण्यात आली. या योजनेद्वारे महिलांना प्रवासासाठी ५०% सवलत देण्यात येते.
अधिक माहितीसाठी क्लिक करा.
५. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना.
विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी , राज्य शासनाच्या महिला कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी, विधवा पेन्शन योजना सुरु करण्यात आली, या योजनेद्वारे महिलांना दार महिना १००० रुपये राज्य शासनाद्वारे दिले जातात.
अधिक माहितीसाठी क्लिक करा.
६. महाराष्ट्र मातृवंदना योजना.
या योजनेअंतर्गत गरोदर महिला व स्तनदा मातांना ५००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लाभार्थी महिलेला हि रक्कम तीन टप्प्यात दिली जाते. जणांनी सुरक्षा योजनेअंतर्गत उर्वरित रक्कम प्रसूतीनंतर दिली जाते.
अधिक माहितीसाठी क्लिक करा.
७. सुकन्या समृद्धी योजना.
या योजनेअंतर्गत मुलीच्या पालकांना २५० रुपयांपासून १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. यावर ७.५ % व्याजदर दिला जातो. हा व्याजदर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या आर्थिक महिन्यानंतर बदलत असतो.
अधिक माहितीसाठी क्लिक करा.
८. जननी सुरक्षा योजना.
देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांकरिता, केंद्र शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील महिलांना शासनाकडून १४०० रुपये इतकी आर्थिक मदत करण्यात येते. तसेच प्रसूती करणाऱ्या आशा सहयोगिनां प्रसूती प्रोत्साहनासाठी ३०० रुपये व प्रसूतीनंतर सेवा पुरवण्यासाठी ३०० रुपये इतकी रक्कम प्रदान करण्यात येते.
अधिक माहितीसाठी क्लिक करा.
९. महिला समृद्धी कर्ज योजना.
या योजनेच्या माध्यमातून स्वतः चा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी ५ लाख ते २० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. कर्जाचा कालावधी ३ वर्षाचा तर व्याजदर ४ टक्के असतो.
अधिक माहितीसाठी क्लिक करा.
RTI २०२४ च्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
No.1 Health Tips For Summer, उन्हाळ्यातील खाद्यपदार्थ : काय खावे आणि काय खाऊ नये.
Best Agri Business Ideas, पशुखाद्य निर्मिती उद्योग कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
T20 World Cup साठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा. या दिवशी होणार दिल्लीत बैठक.