Milk Processing Unit|दुग्ध प्रक्रिया उद्योग कसा सुरू करावा ? वाचा सविस्तर

दुग्ध प्रक्रिया उद्योग

Milk Processing Unit

जगभरातील अनेक देशांमध्ये दुग्ध व्यवसायाचे महत्वपूर्ण आर्थिक योगदान आहे.

अतिशय प्राचीन काळापासून दूध व दुधावर आधारित उत्पादनांना खूप चांगली मागणी आहे. आणि दूध आपल्या दैनंदिन जीवनाचा अमूल्य असा भाग आहे. या लेखामध्ये आपण दुग्ध व्यवसायाचे महत्व, दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा, त्यासाठी सरकार च्या कोणत्या योजनांचा आपण लाभ मिळवू शकतो याबद्दल चर्चा करणार आहोत.

Milk Processing Unit|दुग्ध प्रक्रिया उद्योग इतिहास

प्राचीन काळापासून दुग्धजन्य पदार्थ हे मानवी दैनंदिन जीवनाचा भाग राहिले आहेत. प्राचीन इजिप्त मधील लोक दुधाचे सेवन करत होते तसेच चीज व लोणी यासारखे पदार्थ बनवायचे. तसेच ग्रीस मध्येही लोक दुधाचे सेवन करत होते व दुग्धजन्य पदार्थ बनवत होते. तसेच युरोप व जगभरात दुधाचा वापर मध्ययुगात सुरू झाला.

दुग्धजन्य पदार्थाचे दैनंदिन जीवनातील महत्व

दुध तसेच दुग्धजन्य पदार्थ हे अत्यंत पौष्टिक असतात आणि ते जीवनसत्वांचे प्रमुख स्त्रोत आहेत. दूधामध्ये कॅल्शियम, फॉस्परस, मॅग्नेशियम व पोटॅशियम असतात ते दात व हाडांसाठी आवश्यक असतात. दूधामध्ये प्रोटीन चे प्रमाणही अतिशय उत्तम असते. तसेच दूधामध्ये अ जीवनसत्व व ड जीवनसत्व असतात ते निरोगी डोळे व त्वचेसाठी आवश्यक असतात.

Food Industry मध्ये दूध व दुग्धजन्य उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दुधापासून चीज, लोणी, दही, आइस्क्रीम, पनीर असे अनेक उत्पादने घेतली जातात. या उत्पादनांना अतिशय मागणी असून त्याची किंमत सतत वाढत असते.

दुग्ध प्रक्रिया उद्योग कसा सुरू करावा ? त्याचे टप्पे

दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असल्यास, अनेक गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. त्यातील टप्पे खालीलप्रमाणे

१. दुग्धजन्य पदार्थाच्या बाजाराचे संशोधन करणे

कोणताही व्यवसाय सुरू करण्या अगोदर मार्केट रिसर्च करणे महत्वाचे आहे. आपल्या क्षेत्रातील दुग्धजन्य पदार्थाची मागणी व स्पर्धा यांची माहिती असणे आवश्यक आहे. ग्राहक कोणत्या उत्पादनांना प्राधान्य देतात, कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या उत्पादनांना किती मागणी असते याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या माहितीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चा वापर करू शकतो.

२. व्यवसायाची योजना तयार करणे

मार्केट रिसर्च झाल्यानंतर, आपण व्यवसायाची योजना आखू शकतो, त्यामध्ये व्यवसायाची उद्दिष्ट , धोरणे व अंदाज बांधू शकतो. योजना तयार केल्यानंतर व्यवसायासाठी लागणार निधी व इतर बाकीच्या गोष्टींचा अंदाज बांधता येतो.

३. आवश्यक परवाने

दुग्ध प्रक्रिया उद्योग कायदेशीरपणे चालवण्यासाठी, आपल्याला आवश्यक परवाने व परवाणग्या घेणे आवश्यक आहे. स्थानिक आरोग्य विभागाकडून फूड सर्विस परमिट मिळवता येईल. आपला व्यवसाय संबंधित विभागाकडे नोंदवणे आवश्यक आहे. पर्यावरण विभाग व अग्निशमन विभागाचा परवाना यासारखे परवाने मिळवणे आवश्यक आहे.

४. दुधाचा पुरवठा

दुधाचे पदार्थ तयार करण्यासाठी, आपल्याला दुधाचा पुरवठा आवश्यक आहे. स्वताचा गायीपाळणाचा व्यवसाय नसेल तर, आपण स्थानिक दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करू शकतो. दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी कच्या दुधाचा वापर करन्याअगोदर त्याचे pasteurization करणे आवश्यक आहे. तसेच आपण खरेदी करत असलेले दूध उच्च प्रतीचे आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.

५. उपकरणांची खरेदी

दूध उत्पादने तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, उपकरणे खरेदी करणे आवश्यक आहे. आपण कोणत्या पदार्थाचे उत्पादन करणार आहोत त्यावर त्यासाठी लागणारी उपकरणे अवलंबून आहेत. आपल्याला Pasteurizer, सेपरेटर, Homogenizers, Sterilizers व पकेजिंग साठी लागणारी उपकरणे आवश्यक आहे.

६. कर्मचाऱ्यांची नियुक्ती

आपला दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचा व्यवसाय वाढल्यास, कर्मचारी नियुक्त करावे लागतील, डेअरी व्यवसायात अनुभव असलेले कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना स्वच्छता व अन्न पदार्थ हातळणीबाबत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

७. उत्पादनांची विक्री

दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन सुरू केल्यानंतर, आपल्या उत्पादनांची मार्केटिंग करणे आवश्यक आहे. विविध व्यावसायिक धोरणे, जसे की सोशल मिडियाचा वापर व जाहिराती. संभाव्य खरेदीदारांना आपली उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी प्रदर्शनामध्ये भाग घेऊ शकतो.

दुग्धजन्य पदार्थ बनवणे हा असा व्यवसाय आहे ज्यात आपण लक्षणीय नफा कामवू शकतो. हा एक भांडवल केंद्रित व्यवसाय आहे. ज्यासाठी काळजीपूर्वक नियोजन, बाजाराचा अभ्यास आवश्यक आहे. वेळ आणि प्रयत्नाने आपला दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचा व्यवसाय भरभराटीला येईल व आपल्याला भरीव परतावा मिळेल.

दुग्धजन्य पदार्थांचे प्रकार

१. लोणी

लोणी हा उच्च चरबियुक्त दुग्धजन्य पदार्थ आहे जे दुधाच्या मलईपासून बनवले जाते. शक्यतो पॅन फ्राइंग साठी वापरतात. लोणी मध्ये जीवनसत्व अ व ड असतात, परंतु विशेष पोषाकतत्वे नसतात.

लोणी (१५ ग्राम) खालील पोषकतत्वे प्रदान करते.

ContentAmount% Daily Value
कॅलरीज102
कर्बोदके0.010% DV
फायबर00% DV
साखर0.01
चरबी11.514.7% DV
संतृप्त चरबी7.1735.9% DV
प्रथिने0.120.2% DV
कोलेस्ट्रॉल30.510.2% DV
सोडियम1.560.1% DV

2. ताक

ताक हा एक आंबट चविष्ट पदार्थ आहे. ताक हे दुधातून लोणी बाजूला केल्यानंतर उरणारा फिकट पिवळा द्रव पदार्थ आहे. ताकामध्ये Lactic Acid चे प्रमाण जास्त असते.

ताक (२४५ ग्राम) खालीलप्रमाणे पोषकतत्वे प्रदान करते.

ContentAmount % Daily Value
कॅलरीज152 kcal
कर्बोदके12.0 ग्रॅम4.4% DV
फायबर0 ग्रॅम0% DV
साखर12.0 ग्रॅम
चरबी8.11 ग्रॅम10.4% DV
संतृप्त चरबी4.66 ग्रॅम23.3% DV
प्रथिने7.86 ग्रॅम15.7% DV
कोलेस्ट्रॉल27 मिग्रॅ9% DV
सोडियम257 mg11.2% DV

३. तूप

तूप हे भारतात पारंपरिक रित्या बनवले जाते. तूप बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे.

तूप प्रती चमचा (१३ ग्राम) खालीलप्रमाणे पोषाकतत्वे प्रदान करते.

ContentAmount% Daily Value
नाव
कॅलरीज112 kcal
कर्बोदके0 ग्रॅम0% DV
फायबर0 ग्रॅम0% DV
साखर0 ग्रॅम
चरबी12.75 ग्रॅम16.3% DV
संतृप्त चरबी7.93 ग्रॅम39.7% DV
प्रथिने0.04 ग्रॅम0.1% DV
कोलेस्टेरॉल32.80 मिग्रॅ10.9% DV
सोडियम0.26 mg0% DV

4. दही

दही हा जगातील सर्वात लोकप्रिय पदार्था पैकी एक आहे. याच्या उत्पादनामध्ये प्रथिने कमी करण्यासाठी दूधला गरम करावे लागते. यानंतर दही कल्चर (Lactobacillus and Streptococcus) दुधात सोडतात. तापमान काही तास उबदार ठेवले जाते व नंतर दही थंड करण्यास ठेवले जाते. दही आंबण्यासाठी उबदार ठेवणे आवश्यक आहे. दह्याचे खूप सारे संभाव्य आरोग्य फायदे आहेत.

दही प्रती १०० ग्राम खालीलप्रमाणे पोषकतत्वे प्रदान करते.

ContentAmount % Daily Value
कॅलरीज94 kcal
कर्बोदके4.75 ग्रॅम1.7% DV
फायबर
साखर3.25 ग्रॅम
चरबी4.39 ग्रॅम5.6% DV
संतृप्त चरबी2.39 ग्रॅम12.0% DV
प्रथिने8.78 ग्रॅम17.6% DV
कोलेस्ट्रॉल17 मिग्रॅ5.7% DV
सोडियम34 मिग्रॅ1.5% DV

५. पनीर

पनीर ला स्वयंपाकघरात विशेष असे स्थान आहे. असिडीफिकेशनला चालना देण्यासाठी दूध तापवले जाते, त्यानंतर दुधात Rennet मिसळले जाते त्यामुळे त्याचे दहयात रूपांतर होते, दहींचा निचरा केल्यानंतर जो मलईयुक्त पदार्थ उरतो तो पनीर असतो. चविसाठी आणि जास्त दिवस जतन करण्यासाठी मिठाचा वापर केला जाऊ शकतो.

पनिरमध्ये असणारे पोषक द्रव्ये खालीलप्रमाणे

ContentAmount% Daily Value
कॅलरीज115 kcal
कर्बोदके0.60 ग्रॅम0.2% DV
फायबर0 ग्रॅम0% DV
साखर0.08 ग्रॅम
चरबी9.46 ग्रॅम12.1% DV
संतृप्त चरबी5.43 ग्रॅम27.2% DV
प्रथिने6.78 ग्रॅम13.6% DV
कोलेस्टेरॉल27.7 मिग्रॅ9.2% DV
सोडियम180 mg7.8% DV

दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादनासाठी लागणारी उपकरणे

दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादनासाठी मिल्क टॅंक, Pasteurizer, Separator, Butter Churns इ. उपकरणाची आवश्यकता असते. ते आपण पुढील विडिओ मध्ये बघू.

दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीसाठी लागणारी उपकरणे खालील ठिकाणी मिळू शकतात.

1. Smart Engineering Coimbatore TN

2. Varadraj Industries Pune MH

3. SM Engineering Ahmedabad GJ

व्यवसाय कर्जासाठी सरकारी योजना

१. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना
या योजनेचा मुख्य उद्देश हा लघु उद्योग व व्यवसायासाठी , त्यांचा विकास व विस्तार व्हावा यासाठी कर्ज पुरवठा केला जातो.
कर्जपुरवठा १५००० रुपयांपासून १०००००० रुपायपर्यंत केला जातो.
परतफेडईचा कालावधी तीन ते पाच वर्षापर्यंतचा असतो.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा.

२. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (PMEGP)
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (PMEGP) ही योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली योजना आहे. भारतातील तरुण बेरोजगारांना या योजनेअंतर्गत १० लाख ते २५ लाख रुपायपर्यंतचे कर्ज दिले जाते.
देशातील सर्व तरुणांना स्वता चा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज प्राप्त करून देणे, जेणेकरून त्यांना स्वता चा रोजगार प्राप्त होईल, स्वता चे हक्काचे कामईचे साधन उपलब्ध होईल. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (PMEGP) संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.

आपल्या इतर पोस्ट वाचण्यासाठी खाली क्लिक करा.

Best Agri Business Ideas, पशुखाद्य निर्मिती उद्योग कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

No.1 Health Tips For Summer, उन्हाळ्यातील खाद्यपदार्थ : काय खावे आणि काय खाऊ नये.