IGI एविएशन सर्विसेस
Airport Ground Staff Recruitment 2024
दिल्ली च्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावर CSA प्रोफाइल साठी विमानतळाच्या विविध ग्राउंड विभागांकरीता अर्ज मागवत आहे. (एअरलाईन, ग्राउंड हॅंडलिंग, हॉस्पिटॅलिटी, रिटेल आटलेट्स, फूड कोर्टस आणि कार्गो ) . फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाही.
महत्वपूर्ण दिनांक
Airport Ground Staff Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात | ६ मार्च २०२४ |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | २२ मे २०२४ |
परीक्षेचा तारीख | लवकरच घोषणा केली जाईल |
निकालाची तारीख | परीक्षा झाल्यानंतर १५ दिवसांनी |
पात्रता व वेतन
Airport Ground Staff Recruitment 2024
प्रोफाइल | शैक्षणिक पात्रता | वय | रिक्त पदांची संख्या | वेतन |
एयरपोर्ट ग्राउंड स्टाफ (CSA) | मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी/ त्यापेक्षा जास्त | १८ -३० वर्ष | १०७४ | रु. २५०००/- ते रु. ३५०००/- |
टीप –
- महिला व पुरुष दोघेही अर्ज करू शकतात.
- कोणत्याही विमानण प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा ची आवश्यकता नाही.
- इयत्ता १२ वी चा निकल बाकी असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
लेखी परीक्षेचे स्वरूप
Airport Ground Staff Recruitment 2024
विषय | प्रश्नांची संख्या | वेळ | गुण | |
लेखी परीक्षा | १. सामान्य ज्ञान २. विमान ज्ञान ३. इंग्रजी चे ज्ञान ४. कौशल्य व विचार | २५ २५ २५ २५ | ९० मिनिट | 100 |
अभ्यासक्रमाचे स्वरूप
Airport Ground Staff Recruitment 2024
१. सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती – या भागातील प्रश्नांचा उद्देश हा अर्जदाराची शिकण्याची क्षमता मापन करण्यासाठी आहे. जास्ती जास्त प्रश्न हे अल्फा न्यूमरीक साखळी, कोडिंग व डिकोडिंग, वय मापन, वेग वेळ अंतर इ . प्रकारच्या सामान्य प्रश्नांवर आधारित असेल.
२. सामान्य इंग्रजी – अर्जदाराचे इंग्रजी विषयीचे मूलभूत ज्ञान तपासले जाईल. इंग्रजी व्याकरण , वाक्य संरचना इ . एक पूर्ण प्यारेग्राफ देवून त्यावर प्रश्न विचारले जातील.
३. सामाजिक अभ्यास – १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमातील इतिहास, भूगोल, कला व संस्कृति, नागरीकशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान व पर्यावरण या विषयांवर सामान्य प्रश्न असतील.
४. विमानण ज्ञान – भारतीय विमानतळाची नावे, विमानतळांची शब्दावली, नागरी उदडयण, विमानतळ कोड, आंतरराष्ट्रीय विमानतळांचे ज्ञान.
- लेखी परीक्षेमध्ये १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, प्रत्येकी १ गुणांसाठी, न सोडवलेल्या प्रश्नासाठी कोणतेही गुण दिले जाणार नाही.
- परीक्षेची पातळी इ. १२ वी च्या अभ्यासक्रमाच्या समकक्ष राहील.
- परीक्षा इंग्रजी व हिन्दी भाषेतून देता येईल.
- कोणतीही नेगेटिव मार्किंग सिस्टिम नसेल.
- ऑनलाईन अर्ज भरताना अर्जदारणे परिक्षा केंद्र आपल्या आवडीने व्यवस्थित निवडावे.
- एकदा निवडलेले परीक्षा केंद्र पुनः बदलता येणार नाही.
- IGI एविएशन कडे कोणतेही परीक्षा केंद्र रद्द करण्याचे अधिकार आहे. तसेच परीक्षा केंद्र बदलण्याचा देखील अधिकार आहे.
परीक्षा केंद्र
अ. क्र. | राज्य | परीक्षा केंद्र |
१ | बिहार व उत्तर प्रदेश | आग्रा, गोरखपुर, कानपूर, लखनऊ, प्रयागराज, वाराणसी, पटणा, दरभंगा, मुजफ्फरपूर |
२ | झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल | रांची, भुवनेश्वर, कोलकाता, सिलिगुडी |
३ | कर्नाटक व केरळ | बेंगळुरू, मैसूर, एर्णाकुलम, कान्नूर, तिरुवंतपूरम |
४ | छत्तीसगढ व मध्य प्रदेश | भोपाळ, इंदोऱ, जबलपूर, बिलासपुर, रायपूर |
५ | आसाम व माणिपूर | गुवाहाटी, इंफाळ, डीबरुगढ |
६ | दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड | डेहराडून, नवी दिल्ली, जयपूर, जोधपुर, उदयपूर |
७ | हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, पंजाब | चंदीगढ, शिमला, जम्मू, श्रीनगर, अमृतसर, जलंधर |
८ | आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगाना | विषाखापट्टणम, चेन्नई, मदुरई, हैदराबाद |
९ | महाराष्ट्र व गुजरात | नागपूर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोट |
अर्ज कसा करावा ?
१. ऑनलाईन अर्ज www.igiaviationdelhi.com वर रेजिस्ट्रेशन करून भरावा लागेल. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाही.
२. कोणतीही चुकीची माहिती दिल्यास अर्ज पूर्णपणे रद्द केला जाईल.
३. अर्ज ऑनलाईन सबमिट करण्याअगोदर अर्जदारणे सर्व भरलेली माहिती व्यवस्थित तपासून घ्यावी जसे की फोन नं. , ईमेल, अपलोड केलेल्या फोटो व त्यानंतरच अर्ज सबमीट करावा.
४. ऑनलाईन पोर्टल २२ मे २०२४ रात्री १२.०० वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
५. अर्जदारांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज भरावा. कारण शेवटच्या काही दिवसामध्ये समस्येचा सामना करावा लागू शकतो.
६. परीक्षा शुल्क रु. ३५० आहे. ते कोणत्याही परिस्थितीत रिफंडेबल नाही.
निवडीचे स्थर
१. सर्वात सुरुवातीला लेखी परीक्षा द्यावी लागेल.
२. लेखी परीक्षा पास झाल्यानंतर, दिल्ली च्या ऑफिस मध्ये मुलाखतीसाठी यावे लागेल. मुलाखतीची वेळ व तारीख वेबसाइट वर असलेल्या कॉल लेटर मध्ये कळेल.
३. लेखी परीक्षा, मुलाखतीनंतर पात्र अर्जदारांची मेडिकल चाचणी व चरित्र दाखला बघून निवड केली जाईल.
अर्जदारसाठी अटी व शर्ती
१. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरीत्या वाचून घ्यावी.
२. अर्जदारांना सूचित करण्यात येते की, शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज भरावा. शेवटच्या दिवसात वेबसाइट वर ताण येऊन वेबसाइट तात्पुरत्या स्वरूपात बंद होऊ शकते.
३. अर्जदाराने अर्ज करताना शैक्षणिक व वयाची पात्रता तपासूनच अर्ज करावा.
४. एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा शक्य नाही.
५. अर्जदाराने अर्ज भरताना आपला चालू स्थितीत असणारा, ईमेल व फोन क्रमांक द्यावा जेणेकरून अर्जदारशी संपर्क साधण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
६. परीक्षा केंद्र परिसरात मोबाइल व इतर इलेक्ट्रोनिक वस्तूंवर बंदी आहे.
७. मुलाखतीला बोलवल्यानंतर अर्जदाराला सर्व मूळ कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
८. जन्म तारीख व नाव हे बोर्डाद्वारे प्राप्त झालेल्या प्रमानपत्रावरून घेतले जाईल. इतर कोणताही पुरावा स्वीकारला जाणार नाही.
सूचना
IGI Aviation अर्जदाराकडे कोणत्याही पैश्यांची मागणी करत नाही. तुम्हाला तसा काही संपर्क केल्यास त्याला फ्रॉड समजावे.
Best Chance To Become RPF Officer,RPF भरती २०२४. रेल्वे सुरक्षा दलात ४६६० जागांसाठी मेगाभरती..!