Best Webseries In Hindi ‘पंचायत’ – भारतातील सर्वात आवडती नं. १ हिन्दी वेबसिरीज..!

‘पंचायत’ – भारतातील सर्वात आवडती नं. १ हिन्दी वेबसिरीज..!

Best Webseries In Hindi, ‘पंचायत’ – भारतातील सर्वात आवडती नं. १ हिन्दी वेबसिरीज..!

पंचायत हा वेब शो भारतातील सर्वाधिक पसंतीचा शो म्हणून उदयास आला आहे. पंचायत नाव ऐकले की समोर येते, खेडेगावातील ग्रामपंचायत, ही वेबसेरिज अशाच एका खेड्यातील पंचायत आणि तेथील गावगाड्याबद्दल आहे. ज्या गावाचे काल्पनिक नाव आहे ‘फुलेरा ‘, हे उत्तरप्रदेश मधील एक काल्पनिक गाव आहे. पंचायत ही वेबसेरीज ची पूर्ण कथा ही फुलेरा या गावाच्या गावकऱ्यांच्या व तेथील सचिव असणाऱ्या अभिषेक त्रिपाठी यांच्या अवतीभवती फिरते.

पंचायत ही वेबसेरीज amazon prime video वर प्रदर्शित केली जाते. आतापर्यंत या सेरीज चे दोन भाग प्रदर्शित झालेले आहे आणि तिसऱ्या भागाची शूटिंग सुरू आहे, तो भाग देखील लवकरच प्रदर्शित होईल.

तर चला येऊ आता पंचायत च्या कहाणी कडे, ही कहाणी एकदम साधी सोपी आणि आजकालच्या सुशिक्षित तरुणांच्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे. अभिषेक त्रिपाठी हा एक इंजीनीरिंग झालेला शहरी भागातील तरुण, अधिक चांगली नोकरी नसल्यामुळे, फुलेरा सारख्या अतिशय दुर्गम भागातील खेड्यात सचिव म्हणून नोकरी करतो. पगार कमी आहे ,तर त्याचे कामाचे ठिकाण हेच त्याचे नवीन घर आहे. त्याचे सहकारी हे एकदम साधे, कमी शिक्षित माणसे आहे. अभिषेक त्रिपाठी व त्याचे सहकारी गावातील लोकांच्या सांसारिक व इतर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण अभिषेक ला या सर्वातून बाहेर पडायचे असते, तो रात्रीचा अभ्यास करू लागतो, परीक्षेची तयारी करतो ज्यामुळे त्याच्या नोकरीच्या संधी उजाळतील आणि त्याची या सर्वातून सुटका होईल. पण जसेजसे दिवस,आठवडे निघून जातात तसे तसे अभिषेक ची गावात मैत्री वाढू लागते त्याचा सरपंच कुटुंबाशी संपर्क वाढतो.

पुढे ग्रामसचिव अभिषेक गावात विकासकामे करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला कशी आडकाठी आणली जाते, ही कहाणी अतिशय रंगतदार होते. हे ही सिरीज पाहिल्यावरच लक्षात येईल.

ग्रामीण व शहरी फरक असलेल्या देशात, Amazon Prime प्रदर्शित होणारी पंचायत, मुख्यत: शहरातील व गावाबद्दल जास्त माहिती नसणाऱ्या लोकांना गावाबद्दल माहिती देते. फुलेरा मध्ये महिला सरपंच असूनही, तिचा पती हा खरी सत्ता चालवतो आणि गावातील कामे ही ज्यांना गरज आहे कोणत्या ठिकाणी आवश्यक आहे या आधारावर न करता, महत्वाच्या व्यक्ति कोण आहेत या आधारावर केले जातात. ही सत्य परिस्थिति यातून लोकांसमोर आणली गेली आहे.

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी अतिशय आकर्षक अशी ही वेबसेरीज आहे.

पंचायत मधील भूमिका केलेले अभिनेते :Best Webseries In Hindi

अभिषेक त्रिपाठी (सचिव ग्राम. पंचायत फुलेरा ) – जितेंद्र कुमार
मंजू देवी (प्रधान ग्राम. पंचायत फुलेरा ) – निना गुप्ता
ब्रिज भूषण दुबे (प्रधान पती) – रघुबीर यादव
प्रल्हाद पांडे (उप प्रधान) – फैसल मलिक
विकास (सहायक ग्राम. पंचायत फुलेरा ) – चंदन रॉय
रिंकि (मंजू देवी ची मुलगी) – संविका

पंचायत ची पूर्ण कास्टिंग बघण्यासाठी क्लिक करा.

पंचायत ला मिळालेले अवॉर्ड :

Best Webseries In Hindi

सीजन १

AwardCategoryPlatformResult
Filmfare OTT AwardsBest Comedy SeriesAmazon Prime VideoWon
Filmfare OTT AwardsBest Actor (Comedy Series)Amazon Prime VideoWon
Filmfare OTT AwardsBest Supporting ActorAmazon Prime VideoWon
(Comedy Series)
Filmfare OTT AwardsBest Supporting ActressAmazon Prime VideoWon
(Comedy Series)

सीजन २ –

Date of ceremonyAwardCategoryRecipientResult
28 November 2023International Film Festival of IndiaBest Web Series (OTT)PanchayatWon

पंचायत ला मिळालेले अवॉर्ड बघण्यासाठी क्लिक करा.

आपल्या इतर पोस्ट वाचण्यासाठी खालील पोस्ट वर क्लिक करा.

RTE Admission Maharashtra 2024-25. आर.टी.ई. प्रवेश २०२४-२५ , ऑनलाईन अर्ज भरणे सुरू, पहा वयोमर्यादा, कागदपत्रे, अर्ज कसा व कुठे करावा ?

(2024) महाराष्ट्र लेक लाडकी योजना, Maharashtra Lek Ladaki Yojana 2024.आता एक मुलगी असेल तर मिळणार 1 लाख 1 हजार रुपये, त्वरित अर्ज करा ..!

No.1 Health Tips For Summer, उन्हाळ्यातील खाद्यपदार्थ : काय खावे आणि काय खाऊ नये.

Best Agri Business Ideas, पशुखाद्य निर्मिती उद्योग कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

T20 World Cup साठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा. या दिवशी होणार दिल्लीत बैठक.