Mukhyamantri Vayoshri Yojana|मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 …!

Best Scheme For Senior Citizen , मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र २०२४ …!

Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana

केंद्र व राज्य शासन आपल्या वरीष्ठ नागरिकांसाठी विविध जनकल्यानच्या योजना आणत असते. ज्यातून जेष्ठ नागरिकांना आर्थिक व सामाजिक मदत मिळू शकेल. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘राष्ट्रीय वयोश्री योजना ‘ या नावाने एक नवीन योजना सुरू केली, त्या योजनेला अनुसरून राज्य शासनाने ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजना ‘ या नावाने आपल्या राज्यातील जेष्ठ नागरिकांना लाभ मिळवा या उद्देशाने ही योजना ५ फेब्रुवारी २०२४ या रोजी सुरू केली. या योजनेद्वारे राज्यातील जेष्ठ नागरिकांना ३ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. जेणेकरून उतारवयातील त्यांच्या गरजा ते पूर्ण करू शकतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेचा लाभ कसा घ्यावा?, यासाठी पात्रता , फॉर्म कुठे भरावा ? , यासाठी आवश्यक कागदपत्रे यांच्या संपूर्ण माहितीसाठी आपली पोस्ट सविस्तर वाचा.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ५ फेब्रुवारी २०२४ च्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलेली होती. या योजनेच्या माध्यमातून जे जेष्ठ नागरिक वृद्धत्वामुळे ऐकू शकत नाही, पाहू शकत नाही, व्यवस्थित चालू शकत नाही. आशा नागरिकांना वर्षाला ३००० रुपये रक्कम ही त्यांच्या खात्यावर DBT च्या माध्यमातून डायरेक्ट त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली जाईल. जेणेकरून अशा जेष्ठ नागरिकांना त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याकरिता उपकरणे खरेदी करता येतील. व त्यांना कोणत्याही अडचणीशीवाय जीवन जगता येईल.

Mukhyamantri Vayoshri Yojana योजनेबाबत माहिती :

योजनेचे नावमुख्यमंत्री वयोश्री योजना
सूरुवातमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
लाभार्थी६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
उद्देशःवृद्धापकाळात आर्थिक सहाय्य प्रदान करणे
आर्थिक सहाय्यरक्कम रु. 3,000
अर्थसंकल्पाची रक्कम480 कोटी रु
राज्यमहाराष्ट्र
अर्ज प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाइन
वेबसाईटअधिकृत वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे

Mukhyamantri Vayoshri Yojana या योजनेचा उद्देश :

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र २०२४

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश हा की राज्यातील ६५ वर्ष वायवारील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सह्हाय प्रदान करता यावे, जेणेकरून या वृद्ध व्यक्ति त्यांच्या वृद्धापकाळातील गरज पूर्ण करू शकतील. कारण बऱ्याचश्या वृद्ध व्यक्तींना त्यांच्या या वयात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. व अशा समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार त्यांना रुपये ३००० ची मदत प्रत्येक वर्षाला करणार आहे. जेणेकरून त्यांना स्वावलंबी जीवन जगता येईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजणेकरीत सरकारने ४८० कोटी रुपयांचे बजेट या आर्थिक वर्षात ठेवले आहे, जेणेकरून येणाऱ्या आर्थिक वर्षात या योजनेला लागणाऱ्या निधीची पूर्तता करता येईल. व ही योजना संपूर्ण राज्यात लागू करता येईल. व जेष्ठ नागरिकांना आर्थिक व शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या उपकरणांची यादी खालीलप्रमाणे आहे.:

चश्मा
ट्रायपॉड
कमरेसंबंधीचा पट्टा
फोल्डींग वाकर
स्टिक व्हील चेअर
कमोड खुर्ची
गुडघा ब्रेस
श्रवण यंत्र इत्यादि.

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र या योजनेसाठी पात्रता मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र २०२४

  • मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्याचे जेष्ठ नागरिकच या योजनेसाठी पात्र असतील की ज्यांचे वय हे ६५ वर्षापेक्षा जास्त असेल.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २ लाखापेक्षा कमी असेल हवे.
  • अर्जदार शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम नसावा.
  • अर्जदाराचे चे आधारकार्ड बँक पासबूक ला लिंक असावे.
  • संपूर्ण निधीपैकी ३०% निधी महिलांसाठी आरक्षित असेल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असेल ,
आधार कार्ड
ओळख पत्र
उत्पन्नाचा दाखला.
जात प्रमाणपत्र
स्वयंघोषणपत्र
अपंगत्वाचा दाखला.
बँक पासबूक.
मोबाइल नंबर.
पासपोर्ट साइज फोटो.

मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ साठी अर्ज कसा दाखल करावा ?

महाराष्ट्र राज्याच्या जय नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना थोडासा अवधि थांबावे लागेल, कारण महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी मंजूरी तर दिली आहे, परंतु ऑनलाईन पोर्टल अद्याप तयार करण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर आपण त्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतो.

Credit- Apala Marathi Network.

मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ शासनाचा GR वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या इतर पोस्ट वाचण्यासाठी खाली क्लिक करा.

Best Agri Business Ideas, पशुखाद्य निर्मिती उद्योग कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

(2024) महाराष्ट्र लेक लाडकी योजना, Maharashtra Lek Ladaki Yojana 2024.आता एक मुलगी असेल तर मिळणार 1 लाख 1 हजार रुपये, त्वरित अर्ज करा ..!

RTE Admission Maharashtra 2024-25. आर.टी.ई. प्रवेश २०२४-२५ , ऑनलाईन अर्ज भरणे सुरू, पहा वयोमर्यादा, कागदपत्रे, अर्ज कसा व कुठे करावा ?