Health Tips For Summer| उन्हाळ्यातील खाद्यपदार्थ : काय खावे आणि काय खाऊ नये.

Health Tips For Summer

Health Tips For Summer

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीव्र उष्णता असल्या कारणाने मानवी शरीराकडे अनेक कारणांनी लक्ष द्यावे लागते. भारतातील उन्हाळी हंगाम हा मार्च ते जुन या काळात असतो, या काळात दिवस हा मोठा असतो तर रात्र असतात. या दिवसात तापमान हे उच्चांकावर असते. वाढणारी उष्णता व कोरडे वारे यामुळे तुमच्या शरीराला उच्च तापमानाचा सामना करण्यासाठी आपल्या आहारात बदल करणे आवश्यक असते.


अति उच्च तापमानाची शरीराला सवय नसल्याने, उष्णतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्या उद्भवतात व उन्हाळ्यात तंदुरुस्त राहणे हि प्रत्येकाची प्राथमिकता असते. उन्हाळ्यात आपण जे अन्न व पेय घेत आहोत हे उष्णतेच्या लाटेतून बाहेर पडण्यास महत्वाची भूमिका बजावते.


उन्हाचा काळ हा शक्यतो घरामध्ये राहण्याचा, हलक्या रंगाचे, सैल सुती कपडे घालण्याचा, हलके खाण्याचा व भरपूर पाणी पिण्याचा काळ असतो. उन्हामध्ये घराबाहेर राहिल्यामुळे निर्जलीकरण तसेच त्वचेच्या एलर्जी चा धोका वाढतो. त्यामुळे उन्हाळ्यात तंदुरुस्त , निरोगी व थंड राहण्यासाठी योग्य पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.


उन्हाळ्यात अनेक समस्या उद्भवतात जसे कि, अति उष्णतेमुळे चिडचिडेपणा , शारीरिक समस्या, झोपेचा अभाव. लहान मुले, वयस्कर व्यक्ती व दीर्घकालीन समस्या असलेल्या व्यक्तींना उन्हाळ्यात सर्वात जास्त धोका असतो.

उन्हाळ्यातील आरोग्याचे महत्व

Health Tips For Summer

उन्हाळ्यात डिहायड्रेशन, अपचन, जीवनसत्वे, खनिजांच्या कमतरतेचा धोका उद्भवतो. त्यामळे ताजे, सहज पचणारे आणि शरीर थंड ठेवणारे अन्न खावे. अन्नामध्ये फळे व पालेभाज्यांचे प्रमाण जास्त ठेवावे कारण त्यात पाण्याचे प्रमाण व पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. पिझ्झा बर्गर तसेच इतर कोणतेही फास्ट फूड शक्यतो टाळावे. एकावेळी पोटभर जेवण्यापेक्षा, अनेक वेळा थोड्या थोड्या प्रमाणात जेवले पाहिजे, कारण ते पचण्यास सोपे जाईल व शरीर हलके असल्यासारखे वाटेल.उन्हाळ्यात तीव्र तहान लागते. निर्जलीकरण टाळण्यासाठी द्रव पदार्थाचे सेवन वाढवायला हवे. तहान नसली तरीही वारंवार पाणी प्यायला हवे. कॅफीनयुक्त, कार्बोनेटेड साखर ताठ अल्कोहोल चे प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळावे.

उन्हाळ्यात कोणते पदार्थ खावे:

Health Tips For Summer

दही व बटर मिल्क:
दही व बटर मिल्क यासारखे पदार्थ उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये थंड राहण्यास मदत करतात. तसेच त्यात प्रोटिन्स आणि कॅल्शिअम असते त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. याशिवाय ताकामध्ये पुदिन्याची पाने, जिरेपूड, आणि काळेमीठ टाकूनही पिऊ शकतात.


आवळा:
यामध्ये व्हिटॅमिन क आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते. आवळा हे हृदय व केसांना फायदेशीर असते. एक ग्लास पाण्यात चार चिरलेले ताजे आवळे टाकून त्याचा रस बनवून पिऊ शकता तसेच चवि साठी त्यात थोड्या प्रमाणात मधाचा वापर केला जाऊ शकतो. व काही प्रमाणात बर्फ वापरला जाऊ शकतो.


स्वीट कॉर्न:
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले स्वीट कॉर्न सेवन करणे चांगले असते. हे व्हिटॅमिन अ, ब, इ तसेच फायबर व खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. आपण आपल्या आवडीनुसार कॉर्न ग्रिल, बेक, किंवा उकडू शकतो. भोपळी मिर्चीसह देखील कॉर्न वाफवून खाल्ले जाऊ शकते.


नारळ पाणी:
निसर्गाने दिलेले एक आदर्श ऊर्जा असलेले पेय म्हणजे नारळ पाणी होय. ज्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशियम हे त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात असते. घामामुळे तसेच निर्जलीकरणामुळे ऱ्हास झालेली पोषकतत्वे यातून मिळतात.


ताजी उन्हाळी फळे :
कलिंगड, खरबूज, पपई, बेरी, चेरी, आंबा आणि संत्री उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात आढळतात. या फळांमध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर यांचे प्रमाण भरपूर असते. त्याचे ज्यूस व चवदार सॅलड बनवले जाऊ शकते. सलाड ताजे तयार केले जाते कारण फ्रिज मध्ये ठेवल्यास त्याचा कुरकुरीत पणा कमी होऊ शकतो.

उन्हाळ्यात काय खाऊ नये :

Health Tips For Summer


गरम व मसालेदार अन्न :
मिरची, मोहरी, मिरपूड, आले आणि दालचिनी यासारख्या मसाल्यामध्ये शरीराला फायदेशीर असणारे घटक जरी असले तरी ते उन्हाळ्यात कमी प्रमाणात वापरावे करम ते शरीरावर थर्मोजेनिक प्रभाव पाडतात. मसालेयुक्त, तेलकट पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे उन्हाळ्यात पॉट खराब होऊ शकते.

जंक फूड आणि स्ट्रीट फूड:
सामोसे, वडापाव, भजी, जंक फूड, बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ़्राई यासारखे तळलेले पदार्थ उन्हाळ्यात पचायला जाड जातात. आणि एकंदर आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात.

मांसाहारी पदार्थ:
मटन, मांस आणि गोमांस यासारखे पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात त्यामुळे उन्हाळ्यात ते टाळले जावे. तसेच उन्हाळ्यात मांस सहजपणे दूषित होते आणि या हंगामात अन्न विषबाधेचे एक कारण आहे.

तंदुरी फूड:
तंदुरी खाद्य पदार्थाला चव देण्यासाठी वापरण्यात येणारे मसाले उन्हाळ्यात जठराची समस्या निर्माण करतात. तसेच तंदुरी अन्न चव वाढविण्यासाठी किंचित जळते जे पोटाच्या अस्तरांना त्रास देऊ शकते.

आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स:
आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स हे दोन्ही पदार्थ शरीराला गरम करणारे आहेत. उष्णतेपासून आराम मिळण्याऐवजी ते सेवन केल्यानंतर पोट गरम होते.

चहा व कॉफी:
चहा व कॉफी या दोन्हीमध्ये कॅफिन नावाचा घटक असतो, तो शरीरावर निर्जलीकरणाचा प्रभाव पाडते. तसेच कॅफिन जास्त प्रमाणात घेतले तर शरीराला गरम करते आणि झोपेवरही परिणाम करते.

सुका मेवा:
सुका मेवा जरी आरोग्यदायी असला तरी त्यात पाण्याचे प्रमाण खूप कमी असते. आणि ते शरीरातील उष्णता वाढवते. त्यामुळे उन्हाळ्यात सुक्यामेव्याचे सेवन करण्यापेक्षा फळांना प्राधान्य द्यावे.

विविध प्रकारचे सॉस:
यामध्ये मीठ, प्रिझर्वेटिव्ह व कृत्रिम फ्लेवरचे प्रमाण जास्त असते जे शरीरासाठी हानिकारक असते.

साखरयुक्त पेय :
शरबत व पॅक केलेले फळांचे रस यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे शरीराचे वजन वाढते व मधुमेहाचे कारण बनते. तसेच शरीराचे निर्जलीकरण करून मूत्रपिंडावर परिणाम करतात.

अधिक माहितीसाठी क्लिक करा.

No.1 Health Tips For Summer: It is important to consume appropriate foods and avoid dehydration during the summer season. Summer can bring various health issues such as irritability, physical discomfort, and sleep deprivation. These problems are particularly prevalent among children, adults, and individuals with chronic conditions. Therefore, following summer tips for health is crucial to stay healthy, fit, and cool during the summer months.

इतर पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

RTE Admission Maharashtra 2024-25. | RoyalMarathi.com

(2024) महाराष्ट्र लेक लाडकी योजना, Maharashtra Lek Ladaki Yojana 2024.आता एक मुलगी असेल तर मिळणार 1 लाख 1 हजार रुपये, त्वरित अर्ज करा ..! | RoyalMarathi.com