Best 1 Agri Business ‘डाळ मिल उद्योग’ एक फायदेशीर उपक्रम..!

डाळ मिल उद्योग

हा एक फायदेशीर व्यवसाय उपक्रम असून तो थोड्या गुंतवणुकीनेही सुरू करता येतो. डाळ ही दैनंदिन जीवनात वापरली जाते. आणि दिवसेंदिवस तिची मागणी खूप वाढत आहे. उत्पादन कितीही वाढले तरीही मागणीची पूर्तता होत नाही. या लेखात डाळ मिल युनिट सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींविषयी चर्चा करू.

भारतात डाळींचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. तसेच भारत हा सर्वात मोठा डाळींचा ग्राहक आहे. डाळ हा भारतीयांच्या स्वयंपाक घरातील मुख्य खाद्यपदार्थ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे डाळ मिल चा व्यवसाय हा एक फायदेशीर उपक्रम ठरलेला आहे. कडधान्य हे प्रथिने, खनिजे व जीवनसत्व यांचे समृद्ध स्त्रोत असल्यामुळे ते दैनंदिन आहारात आवश्यक असतात. कडधान्य फक्त मानवी उपयोगासाठी न वापरता पशु खाद्य निर्मितीसाठी देखील वापरली जातात. त्यामुळे डाळ ही एक अत्यावश्यक बाब असून तिला शास्वत मागणी असते.

डाळ मिल मध्ये फोलपट काढणे आणि डाळीचे तुकडे करणे या प्रक्रियेला मिलिंग म्हणतात. त्यानंतर डाळींची साफसफाई, प्रतवारी यांनी विभाजन केले जाते. दाल मिल उद्योग हा भारतातील प्रमुख कृषि उद्योगापैकी एक आहे.

बाजारपेठ

भारत हा डाळींच्या जागतिक उत्पादना पैकी २५% पेक्षा जास्त उत्पादन करतो. तसेच भारत जगातील सर्वात मोठा डाळींचा ग्राहक मानला जातो. भारतामध्ये डाळींचा वापर जास्त प्रमाणात आहे. डाळ ही प्रत्येक भारतीयाच्या घरातील मुख्य अन्नपदार्थ आहे.

भारत डाळींची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कॅनडा, म्यानमार आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांकडून डाळी आयात करतो. भारतात पुरवठ्यापेक्षा डाळींची मागणी जास्त आहे. त्यामुळे डाळ निर्मिती उद्योगासाठी भारत एक आकर्षक बाजारपेठ आहे.

उत्पादन क्षमता

डाळ मिल उद्योग ची उत्पादन क्षमता ही यंत्रांची क्षमता, डाळींचा दर्जा व बाजारातील मागणी याच्यावर अवलंबून असते. लहान स्केल युनिट २०० ते ५०० किलो पर्यंतच्या प्रक्रिया केलेल्या डळींचे उत्पादन करू शकते. तर मोठे यूनिट दररोज २००० ते ५००० किलो पर्यंतच्या प्रक्रिया केलेल्या डाळींचे उत्पादन करू शकते.

आवश्यक गुंतवणूक

डाळ मिल उद्योग सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक आपल्याला किती प्रमाणात उत्पादन घ्यायचे आहे त्यावर अवलंबून असते. लहान स्केल युनिट सुरू करण्यासाठी रु. २००००० ते रु. ३००००० पर्यंतची गुंतवणूक आवश्यक आहे. तर मोठ्या स्वयंचलित युनिटसाठी रु. १०००००० ते रु. २०००००० पर्यंतची गुंतवणूक आवश्यक आहे. ज्यामध्ये यंत्रसामग्री आणि खेळते भांडवल यांचा समावेश आहे.

डाळ मिल उद्योगा साठी स्थान निश्चिती

कोणत्याही व्यवसायाच्या यशासाठी स्थान हे अतिशय महत्वाची भूमिका बजावते. शेतकऱ्यांना सहज उपलब्ध असलेल्या आणि बाजारपेठे शी सहज जोडल्या गेलेल्या परिसरात डाळ मिल असावी. डाळ मिल अशा परिसरात असावी जिथे अखंड विजेचा पुरवठा व वाहतुकीच्या चांगल्या सुविधा असाव्यात. कच्चा माल, तयार माल व यंत्रसामग्री ठेवण्यासाठी पुरेशी जागा असलेला परिसर निवडावा.

डाळ मिल उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री

डाळ मिल साठी Pulse Cleaner, Destoner, Grader, Dal Mill, Sorting Conveyor आणि Packaging Machine इ. यंत्रसामग्री ची आवश्यकता लागते.

  • पल्स क्लीनर (Pulse Cleaner) याचा वापर डाळीतील दगड, धुळ, पाने व कचरा काढून टाकण्यासाठी होतो.
  • डी स्टोनर (Destoner) याचा वापर डाळीमधून दगड व इतर जड कण काढण्यासाठी होतो.
  • ग्रेडर (Grader) डाळीच्या वजन व आकारानुसार प्रतवारी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • डाळ मिल (Dal Mill) डाळीचे दोन भाग करण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • सोर्टिंग कनवेयर (Sorting Conveyor) डाळीचे वेगवेगळ्या श्रेणीनुसार वर्गीकरण करण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • पॅकेजिंग मशीन (Packaging Machine) वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्यांमध्ये डाळीच्या पॅकेजिंगसाठी याचा वापर केला जातो.

कच्चा माल

डाळ मिल युनिटसाठी लागणार कच्चा माल म्हणजे चणा डाळ, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ व मसूर डाळ इ. कच्चा मालाचा दर्जा हा तयार उत्पादनाचा दर्जा ठरवतो. आणि म्हणूनच चांगल्या दर्जाच्या डाळींचा वापर करणे महत्वाचे आहे.

डाळ मिल प्रक्रियेत खालील बाबींचा समावेश होतो.

स्वच्छता(Cleaning) :

ही या प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. यामध्ये दगड, धुळ, पाने इ. अशुद्धता काढून टाकल्या जातात.

प्रतवारी(Sorting) :

साफ केलेल्या डाळींची आकार व वजनानुसार वर्गीकरण केले जाते.

दळणे(Grinding) :

प्रतवारी केलेल्या डाळी, नंतर डाळ मिल मध्ये दळतात. डाळ मिल भुसाला वेगळे करून कडधाण्याचे दोन भागात तुकडे करते. विभाजित झालेल्या डाळी नंतर सोर्टिंग कनव्हेअर मधून जातात आणि नंतर त्याच्या रंग व आकार मानानुसार विभक्त केल्या जातात.

पॅकेजिंग (Packaging) :

विभक्त केलेल्या डाळी वेगवेगळ्या आकाराच्या बॅग मध्ये पॅक केल्या जातात.

मार्केटिंग

कोणत्याही व्यवसायात यश मिळविण्यासाठी मार्केटिंग ही एक अतिशय महत्वाची बाब आहे. आपल्या युनिट मध्ये तयार झालेले उत्पादन होलसेल विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि थेट ग्राहकांना विकू शकते. तसेच व्यवस्थित पॅकेजिंग करून निर्यात देखील केली जाऊ शकते.

वृत्तपत्रे, मासिके व इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाहिराती करून आपल्या उत्पादनांची विक्री आपण करू शकतो. संभाव्य ग्राहकांना आपल्या उत्पादनांची ओळख करून देण्यासाठी आपण ग्राहक मेळावे व प्रदर्शनामध्ये भाग घेऊ शकतो.

दाल मिल युनिट साठी असणाऱ्या शासनाच्या PMFME योजनेच्या माहितीसाठी खालील विडियो बघा.

स्वत: चे डाळ मिल युनिट असणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊयात खालील विडियो च्या माध्यमातून.

डाळ मिल युनिट तयार करणारे उद्योग खालीलप्रमाणे

  1. Samay AGRO-TECH Pvt Ltd. Rajkot GJ.
  2. Shri Viratra Engineering. Jodhpur RJ.
  3. S.K. Engineering And Steel Fabrication. Indore MP.

आपल्या इतर पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Best Agri Business Ideas, पशुखाद्य निर्मिती उद्योग कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

दुग्ध प्रक्रिया उद्योग कसा सुरू करावा ? वाचा सविस्तर