गर्जा महाराष्ट्र माझा..! महाराष्ट्र हे अरबी समुद्राची ७२० किमी. किनारपट्टी लाभलेले , नैसर्गिक सौंदर्याने नटलेले, भारताच्या पश्चिम भागातील एक महत्वाचे राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात तृतीय (क्षेत्र. ३,०७,७१३ चौ. किमी.),तर लोकसंख्येच्या दृष्टीने (१३कोटी ) द्वितीय क्रमांक लागतो. महाराष्ट्राला कर्नाटक, गोवा, तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, दादर व नगर हवेली यांच्या सीमा लागून आहेत.
मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी असून , ती भारताची आर्थिक राजधानी म्हणून देखील ओळखली जाते. तसेच जगभरात संत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहर हे उपराजधानी आहे. पश्चिमेला असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा व कोकण किनारपट्टीमुळे पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील महाराष्ट्राला महत्व आहे.
महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभलेला असून, जगतद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत मुक्ताई, संत गाडगेबाबा इत्यादी. मुळे महाराष्ट्राला ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा फार मोठा इतिहास आहे. महाराष्ट्र उद्योगधंद्याच्या तसेच शेतीच्या दृष्टीनेदेखील भारतातील अतिशय महत्वाचे राज्य आहे.
इतिहास
गर्जा महाराष्ट्र माझा..!
महाराष्ट्रातील स्थळे, नद्या, पर्वते इत्यादी. चा रामायण व महाभारत अशा प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळून येतो. महाराष्ट्रात विविध कालखंडात विविध शासनकर्त्यांनी शासन केलेले होते, त्यापैकी मौर्य, मगध, चालुक्य, राष्ट्रकूट यांचे मध्ययुगीन कालखंडात शासन होते. इ.स.पु. ३ऱ्या व ४थ्या शतकात मौर्य साम्राज्याने महाराष्ट्रावर शासन केले, त्यानंतर इ.स.पु. २३० पासून जवळपास चारशे वर्षापर्यंत सातवाहन राज्यांचे शासन होते. सातवाहन काळात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. त्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी, देवगिरीचे यादव यांचे शासन होते, ६व्य शतकात चालुक्य, १२व्या व १४व्या शतका दरम्यान देवगिरीच्या यादवांनी राज्य केले. यादवांनी प्रथमतः त्या कामकाजात मराठी भाषेचा वापर केला. मराठी संस्कृतीचा उगम हा यादव कालखंडात झाला.
महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
मराठा साम्राज्य
१७व्या व १८व्या शतका दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदुस्थानच्या राजकीय पटलावर मराठा साम्राज्याचे वर्चस्व गाजवले. इ.स.वि. सन १६३० मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला व इ.स.वि. सन १६७४ मध्ये रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांनंतर छ. संभाजी महाराज द्वितीय छत्रपती म्हणून गादीवर बसले., त्यांच्या कार्यकाळात ते एकही लढाई पराभूत झाले नाही. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर पुढील काही दशकात, मराठा साम्राज्याची सूत्रे, मराठ्यांचे प्रतिनिधी म्हणून पेशव्यांनी सांभाळली. त्यानंतर बरीच वर्षे ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
मराठा साम्राज्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्र राज्य निर्मिती
भारत स्वतंत्र झाल्यानंतर, राज्यांच्या पुनर्रचनेत भाषावार प्रांतरचना करण्यावर भर होता. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्यास नकार दिला. त्याविरोधात महाराष्ट्रातील लोकांनी आंदोलन केले, यात १०५ जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. अखेर १ मे १९६० ला कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ यासह मराठी भाषिक महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने विविध मराठी भाषिक भागांना एकत्र आणले, परंतु सध्या कर्नाटकमध्ये असणाऱ्या बेळगावसह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मिती इतिहास जाणून घेण्यासाठी क्लिक करा
आर्थिक
गर्जा महाराष्ट्र माझा..! No.1 State In India.
महाराष्ट्र राज्य हे भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आहे, महाराष्ट्र हे एक प्रगतिशील, पुरोगामी राज्य आहे. देशाच्या आर्थिक उत्पन्नात महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे. देशाच्या सर्व महत्वाच्या आर्थिक संस्था, जसे कि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज व इतर महत्वाच्या कॉर्पोरेट संस्थांची कार्यालये राज्यात आहेत. एकूण आर्थिक उत्पन्नापैकी ४६% हिस्सा कृषी व त्यासंबंधित उत्पादनातून मिळते. मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर, चाकण, नाशिक इत्यादी. ठिकाणी मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत, त्यामध्ये रासायनिक, कापड उद्योग,यांत्रिकी, टेलिकॉम, लोह-पोलाद, वाहन निर्मिती, औषधे निर्मिती, मद्य निर्मिती व नाशिमधील ओझर येथे विमान बनविण्याचा देखील कारखाना आहे.
महाराष्ट्राचे आर्थिक महत्व जाणून घेण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्राची लोकसंख्या
महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास १३ कोटींच्या आसपास असून त्यापैकी २०११ च्या जनगणने नुसार हिंदू धर्मीय – ८० %, मुस्लिम धर्मीय – ११.५४ %, बौद्ध -५.८१ % , जैन -१.२५ %, ख्रिश्चन – ०. ९६ % व इतर ०. ३६% आहे.
मुख्य शहरे
मुंबई – महाराष्ट्राची राजधानी असून भारताचे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे, येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने अनेक राज्यातून रोजगारासाठी लोक मुंबई येथे येतात.
पुणे – पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, ते राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तसेच ते इंफॉर्मशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात आघाडीचे केंद्र आहे.
नाशिक – नाशिक हे पंचवटी व त्रयंबकेश्वर सारख्या धार्मिक स्थळांची प्रसिद्ध आहे, येथे दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
छ. संभाजीनगर – महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते, येथे वेरूळ, अजिंठा, भद्रा मारुती, देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा इ. धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.
नागपूर – नागपूर हे राज्याची उपराजधानी असून विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर आहे.
कोल्हापूर – शिवाजी महाराजांच्या काळापासून महत्वाचे असलेले ऐतिहासिक शहर असून महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
अहमदनगर – या ठिकाणी देशाच्या सैन्यदलाचे प्रमुख दारुगोळा केंद्र असून, शिर्डी साईबाबा व शनिशिंगणापूरच्या शनी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
दळणवळण व्यवस्था
गर्जा महाराष्ट्र माझा..! No.1 State In India.
महाराष्ट्रात महामार्गांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, समृद्धी एक्सप्रेस वे हे अतिशय वेगवान व प्रसिद्ध महामार्ग आहेत आणि नवीन शक्तीपीठ एक्सप्रेसवे(नागपूर ते गोवा) नियोजित आहे. तसेच, महाराष्ट्राच्या बहुतेक भागात रेल्वेचे जाळे पसरलेले आहे, पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरामध्ये मेट्रो सेवेची सुरवात करण्यात आलेली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या सेवेचे जाळे शहरापासून तर गावखेड्यापर्यंत पोहचलेले आहे.
विमान वाहतूक – नांदेड,अकोला ,अमरावती ,उस्मानाबाद ,लातूर ,कराड ,जळगाव ,अहमदनगर(शिर्डी) ,सोलापूर ,सांगली ,कोल्हापूर ,भंडारा,नाशिक ,धुळे,शहरात हवाई धावपट्या असून येथून हवाई वाहतूक चालते.
कोल्हापूर,औरंगाबाद ,मुंबई ,पुणे ,नागपूर, शिर्डी (अहमदनगर ) या सहा शहरातून हवाई वाहतूक चालते.
नवी मुंबई (ठाणे ),सिंधुदुर्ग येथे ग्रीनफील्ड विमानतळांची उभारणी केली जात आहे.
पर्यटन स्थळे
महाराष्ट्रातील विविधतेमुळे इतर भारतीय राज्यातील आणि परदेशातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतात.महाराष्ट्रातील ऐतिहासिक व महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी लोक संपूर्ण देशातून महाराष्ट्रात येतात.महाबळेश्वर, लोणावळा आणि माथेरान ही पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे (महाराष्ट्रातील पर्यटन ठिकाणे) आहेत.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मराठा साम्राज्याच्या कालखंडातील शेकडो किल्ले आहेत. हे किल्ले आणि आजूबाजूच्या टेकड्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील असल्यामुळे ट्रेकिंग, गिर्यारोहण आणि हेरिटेज टूरिझममध्ये स्वारस्य असलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, तीर्थक्षेत्रे बघायलाही पर्यटक महाराष्ट्राला भेट देतात.
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर १० पर्यटन स्थळे बघण्यासाठी क्लिक करा.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे
महाराष्ट्राला समृद्ध असा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्यासाठी भेट देण्यायोग्य ठिकाणे खालीलप्रमाणे :
१. गेटवे ऑफ इंडिया, मुंबई
२. एलिफंटा लेणी
३. आगा खान पॅलेस
४. अजिंठा लेणी
५. एलोरा लेणी
६. कान्हेरी गुहा
७. शनिवार वाडा
८. रायगड किल्ला
९. सिंहगड किल्ला
१०. कुलाबा किल्ला
११. सीताबुलडी किल्ला
१२. कार्ला बुद्ध लेणी
१३. महात्मा फुले संग्रहालय इ.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे
१. कोल्हापूर
२. तुळजापूर
३. सप्तशृंगी
४. माहूर
५. गोंदवले
६. पैठण
७. देहू
८. आळंदी
९. पंढरपूर
१०. अक्कलकोट
११. त्र्यंबकेश्वर
१२. घृष्णेश्वर
१३. परळी-वैजनाथ
१४. औंढा -नागनाथ
१५. शिर्डी
१६. गणपतीपुळे
१७. हरिहरेश्वर
१८. त्र्यंबकेश्वर
१९. शनी-शिंगणापूर
२०. भीमाशंकर
२१. ज्योतिबा मंदिर
२२. जेजुरी खंडोबा मंदिर
२३. मोरेश्वर मंदिर पुणे
२४. रांजणगाव
२५. ओझर
२६. थेऊर
२७. लेण्याद्री
२८. सिद्धटेक
महाराष्ट्राबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा.
No.1 Health Tips For Summer, उन्हाळ्यातील खाद्यपदार्थ : काय खावे आणि काय खाऊ नये.
Best Agri Business Ideas, पशुखाद्य निर्मिती उद्योग कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.