T20 World Cup साठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा. या दिवशी होणार दिल्लीत बैठक.

T20 World Cup साठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा. या दिवशी होणार दिल्लीत बैठक. सध्या भारतामध्ये आयपीएल २०२४ चा थरार चालू आहे. सर्व संघ जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. यंदाच्या आयपीएल मध्ये विदेशी खेळाडू पेक्षा भारताचे खेळाडू सरस ठरत आहेत. आयपीएल झाल्यानंतर लगेचच आंतराष्ट्रीय T20 World Cup होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघामध्ये कुणकूनाची वर्णी लागेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लवकरच अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिति बैठक घेऊन निर्णय देईल.

T20 World Cup मध्ये सहभागी होणारे सर्वच देश १ मे पर्यन्त आपले १६ सदस्यीय संघ जाहीर करतील. मीडिया रिपोर्टनुसार टीम इंडियाच्या निवडीसाठी बीसीसीआय लवकरच दिल्ली मध्ये बैठक घेणार आहे. शक्यतो ही बैठक २७ किंवा २८ एप्रिल ला होईल, कारण यादरम्यान मुंबई व दिल्ली संघाचा या वेळी दिल्ली मध्ये सामना असेल आणि त्यावेळी भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा हा या बैठकीसाठी उपलब्ध असेल.

विराट कोहली, दिनेश कार्तिक यासारखे अनुभवी खेळाडू निवडीबाबत आशा बाळगून आहेत तर, नवोदित खेळाडू आपल्या प्रदर्शनाद्वारे टीम इंडियाचे दार ठोटावत आहेत. त्यामुळे संघात कुणाची वर्णी लागेल हे लवकरच कळणार आहे. निवड समिति युवा खेळाडूंवर विश्वास दाखवते की अनुभवाला प्राधान्य देते हे बघावे लागेल.

यावर्षीच्या T20 World Cup चे यजमानपद अमेरिका व वेस्ट इंडिज संयुक्तपणे भूषवणार आहे. T20 World Cup स्पर्धा येत्या २ जून पासून सुरू होणार आहे. स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले आहे. आता चाहते सर्व सहभागी देशांचे संघ कधी जाहीर होतील याची आतुरतेने वाट पाहत आहेत. १५ मे ही संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख असेल. याशिवाय २५ मे पर्यन्त १६ सदस्यीय संघात बदल करता येईल. स्पर्धा सुरू होण्या अगोदर प्रत्येक संघाचे सराव सामने खेळवले जातील. स्पर्धेची सुरुवात अमेरिका व कॅनडा या संघातील सामन्याने होईल. तर भारताची पहिला सामना ५ जून ला आयर्लंड विरुद्ध होईल आणि पाकिस्तान विरुद्धचा सामना ९ जुने रोजी खेळवला जाईल.

आयसीसी ने भारताला ग्रुप ए मध्ये ठेवले आहे, भारतासह आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडा हे ग्रुप ए मध्ये असतील. प्रत्येक संघ आपल्या उर्वरित ४ संघाविरुद्ध खेळेल, प्रत्येक ग्रुप मधील अव्वल दोन संघ हे सुपर ८ साठी पात्र ठरतील. त्यातून पुढे ४ संघ सेमिफायनल साठी पात्र ठरतील , त्यातून दोन फायनल साठी जाऊन अंतिम विजयी संघ हा T20 World Cup २०२४ चा विजेता असेल.

भारतीय संघाचे सामने पुढील प्रमाणे खेळवले जातील :

ICC T20 World Cup
पहिला सामना ५ जून – आयर्लंड विरुद्ध
दूसरा सामना ९ जून – पाकिस्तान विरुद्ध
तिसरा सामना १२ जून – अमेरिका विरुद्ध
चौथा सामना १५ जून -कॅनडा विरुद्ध होईल, हा साखळी फेरीतील शेवटचा सामना असेल.
भारत साखळी फेरीतील पहिले तीन सामने न्यूयार्क मध्ये खेळणार असून , शेवटचा साखळी सामना लॉडरहिल येथील मैदानावर होणार आहे.

T20 World Cup साठी भारताचा संभाव्य संघ


भारतीय संघाची निवड रणजी स्पर्धा, आयपीएल व आंतररास्ट्रीय सामन्यातील प्रदर्शन विचारात घेऊन केले जाऊ शकते. तर संभाव्य संघ पुढीलप्रमाणे असू शकतो :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बूमराह(उपकर्णधार), विराट कोहली , के एल राहुल, शुभमन गिल, यशस्वी जैसवाल , रिंकु सिंग , ऋतुराज गायकवाड , शुभम दुबे , सूर्यकुमार यादव , कुलदीप यादव , ईशान किशन, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, रवी बिसनोई इत्यादि.
हार्दिक पांड्या , दिनेश कार्तिक यांना नवोदित खेळाडूंचे प्रदर्शन बघता संधि मिळणे अशक्य वाटते. तरी सर्वांचे भविष्य निवड समितीच्या निर्णयावरच अवलंबून असेल.

ICC T20 World Cup आजपर्यंतचे विजेते :

२००७ – भारत
२००९ – पाकिस्तान
२०१० – इंग्लंड
२०१२ – वेस्ट इंडिज
२०१४ – श्रीलंका
२०१६ – वेस्ट इंडिज
२०२१ – ऑस्ट्रेलिया
२०२२ – इंग्लंड

ICC T20 World Cup च्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक बघण्यासाठी क्लिक करा.
ICC T20 World Cup संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा.
IPL 2024 चे सामने लाईव बघण्यासाठी क्लिक करा.

आपल्या इतर पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

RTE Admission Maharashtra 2024-25. आर.टी.ई. प्रवेश २०२४-२५ , ऑनलाईन अर्ज भरणे सुरू, पहा वयोमर्यादा, कागदपत्रे, अर्ज कसा व कुठे करावा ?

(2024) महाराष्ट्र लेक लाडकी योजना, Maharashtra Lek Ladaki Yojana 2024.आता एक मुलगी असेल तर मिळणार 1 लाख 1 हजार रुपये, त्वरित अर्ज करा ..!

No.1 Health Tips For Summer, उन्हाळ्यातील खाद्यपदार्थ : काय खावे आणि काय खाऊ नये.

Best Agri Business Ideas, पशुखाद्य निर्मिती उद्योग कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.