PM Surya Ghar Muft Bijli Yojna 2024
सद्यस्थितीला मानवाद्वारे पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर ज्या पद्धतीने सुरू आहे. त्यानुसार येणाऱ्या काळात ऊर्जेची कमतरता अधिक प्रमाणात भासणार आहे. त्यामुळे अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा अधिक वापर करणे गरजेचे आहे.
सौर ऊर्जा हा एक अपारंपारिक ऊर्जास्रोत असून तो मोफत व मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आणि सौर उर्जेमुळे वायु मंडळात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण वाढत नाही.
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना : भारत सरकार कडून विविध प्रकारच्या योजना जारी केल्या जात आहेत. भारत सरकार आपल्या नागरिकांबद्दल खूप जागरूक आहे. आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना आणत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना ही योजना जाहीर केलेली असून, देशातील १ कोटी घरांमध्ये मध्यम व गरीब कुटुंबांसाठी सौर पॅनल बसविण्यास सुरुवात केलेली आहे. पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना ही योजना हरित ऊर्जा अभियानाला चालना देऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करेल व रोजगाराच्या नवीन संधि निर्माण करेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी १ फेब्रुवारी ला अर्थसंकल्प सादर करताना पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना सुरू करण्याची घोषणा केली.
PM Surya Ghar Muft Bijli Yojna चा उद्देश :
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेच्या माध्यमातून १ कोटी घरांना दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाईल, या योजणेमुळे १ कोटी कुटुंबांची वार्षिक १५००० कोटी रुपयांची बचत होईल. आणि त्यांच्याकडे अतिरिक्त वीज शिल्लक राहिल्यास ते ती वीज महावितरण ला विकू शकतात व त्यापासून उत्पन्न मिळवू शकतात. या योजनेमुळे वाहन चार्जिंग उद्योग, सोलार पॅनल पुरवठा व स्थापना उद्योग याद्वारे उद्योजकांना संधि उपलब्ध होतील. यासोबतच पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना द्वारे सोलार पॅनल निर्मिती, स्थापना आणि देखभाल यामध्ये तांत्रिक कौशल्य असणाऱ्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधि निर्माण होतील.
योजनेचे नाव | पीएम सूर्य घर मोफत वीज योजना |
---|---|
लाभार्थी | देशाचे नागरिक |
उद्देश | मोफत वीज पुरवणे. |
लाभ | 300 युनिट मोफत विजेचा लाभ , सौर पॅनेल स्थापित करणे. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | pmsuryaghar.gov.in |
सबसिडी कॅल्कुलेटर | क्लिक करा |
PM Surya Ghar Muft Bijli Yojna चे फायदे
ही योजना घरांमध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी नाही तर लोकांना सौर ऊर्जेचे महत्व कळावे व त्याचा त्यांनी फायदा घ्यावा. ही योजना भारतातील कुटुंबावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी व पर्यावरण वाचविण्याच्या दिशेने काम करते. योजनेपासून मिळणारे लाभ खालीलप्रमाणे :
- जवळपास १ कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेद्वारे दर महिन्याला ३०० युनिट मोफत वीज दिली जाईल.
- सोलार पॅनल विकत घेण्यासाठी सरकार कडून सबसिडी दिली जाईल.
- सरकार द्वारे बँकांकडून कर्ज उपलब्ध होण्यासाठी सहाय्यता व मार्गदर्शन दिले मिळेल.
PM Surya Ghar Muft Bijli Yojna च्या विशेषता :
- आर्थिक सहाय्य व सबसिडी
या योजनेच्या लाभार्थी यांना आपल्या घरावर सोलार पॅनल बसविण्यासाठी कर्ज उपलब्ध होण्यास सहाय्य व मार्गदर्शन केले जाईल. तसेच मिळणारी सबसिडी ही त्याच्या खात्यात वर्ग केली जाईल.
- सौर ऊर्जा प्रणालीला प्रोत्साहन
या योजनेची लोकप्रियता वाढविण्यासाठी ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्था यांना आपल्या अधिकार क्षेत्रात घरच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
- राष्ट्रीय ऑनलाईन पोर्टल एकत्रीकरण
ग्राहक तसेच स्थानिक व वित्तीय संस्था संहित सर्व लाभ धारक यांना एक ऑनलाईन पोर्टल द्वारे एकीकृत केले जाईल. जे अर्ज व त्यापुढील प्रक्रिया एक ठिकाणी पार पडेल.
- आर्थिक व पर्यावरणीय फायदे
या योजने द्वारे वीज बिल कमी तर होईलच पण रोजगाराच्या प्रचंड संधि उपलब्ध होतील. तसेच उत्पन्न मिळविण्याच्या संधी ना प्रोत्साहन मिळेल. कार्बन उत्सर्जन कमी होण्याची मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशाच्या हरित भविष्याला चलना मिळेल. भारत देश ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होईल. ही योजना भारतीय नागरिकांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक घरापर्यंत वीज पोहचण्यास मदत होईल.
PM Surya Ghar Muft Bijli Yojna साठी लागणारी महत्वाचे कागदपत्रे
जर कोणालाही PM Surya Ghar Muft Bijli Yojna साठी पात्र व्हायचे असेल तर त्याच्याकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे :
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- वीज बिल
- बँक पासबुक
- पासपोर्ट साइज फोटो
- रेशन कार्ड
- मोबाइल नंबर
- स्वयंघोषणा पत्र
- उत्पन्नाचा दाखला
PM Surya Ghar Muft Bijli Yojna अर्ज प्रक्रिया
- सर्वात अगोदर या योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmsuryaghar.gov.in वर जावे.
- होम पेजवर Apply For Rooftop Solar या ऑप्शन वर क्लिक करावे.
- सर्वात अगोदर आपल्याला Registration करून घ्यावे लागेल. त्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता लागेल. राज्य, राज्य वीज वितरण कंपनी, मोबाइल नंबर, ईमेल व ग्राहक क्रमांक इ.
- त्यानंतर पुढील प्रमाणे अर्ज करावा.
Step 1
खालीलप्रमाणे पोर्टल वर Registration करावे.
- आपले राज्य निवडा .
- आपली विद्युत वितरण कंपनी निवडा .
- आपला विद्युत वितरण कंपनीचा ग्राहक क्रमांक टाका.
- मोबाइल नंबर टाका.
- ईमेल टाका.
- कृपया पुढील निर्देशांचे पालन करा.
Step 2
- ग्राहक क्रमांक व मोबाइल नंबर द्वारे लॉगिन करावे.
- फॉर्म नुसार Rooftop Solar साठी अर्ज करावा.
Step 3
- वीज पारेषण कंपनी कडून मिळणाऱ्या प्रतिसादाची प्रतीक्षा करावी. आपल्याला पूर्वसंमती मिळाल्यानंतर कोणत्याही अधिकृत डीलर कडून आपण सोलार यंत्रणा बसवून घेऊ शकतो.
Step 4
- Installation पूर्ण झाल्यानंतर नेट मिटर साठी अर्ज करावा लागेल.
Step 5
- मीटर स्थापना व पारेषण कंपनी द्वारे निरीक्षण केल्यानंतर ते पोर्टल द्वारे कामिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.
Step 6
एकदा की कामिशनिंग रीपोर्ट मिळाला की पोर्टल च्या माध्यमातून बँक खात्याचे स्टेटमेंट व एक Cancelled चेक जमा करावा. त्यानंतर ३० दिवसाच्या आत आपल्या बँक खात्यात सबसिडी जमा केली जाईल.
PM Surya Ghar Muft Bijli Yojna सबसिडी
Subsidy For Residential Households
Rs. 30000/- per kW up to 2 kW
Rs. 18000/- per kW up to additional Capacity Up to 3 kW
Total Subsidy for system larger than 3kW capped at Rs. 78000/–
Suitable Rooftop Solar Plant Capacity For Households
Average Monthly Electricity Consumption (Units) | Suitable Rooftop Solar Plant Capacity |
0-150 | 1 – 2 kW |
150-300 | 2 – 3 kW |
>300 | Above 3 kW |
Subsidy For Group Housing Society/ Resident Welfare Association (GHS/RWA)
FAQ :
१. PM Surya Ghar Muft Bijli Yojna काय आहे ?
ही योजना मध्यम व गरीब कुटुंबाला प्रतिमहिना ३०० युनिट मोफत वीज देऊन सोलार पॅनल पासून उत्पन्न वाढविण्याची योजना आहे.
२. PM Surya Ghar Muft Bijli Yojna मध्ये किती सबसिडी मिळते ?
या योजने द्वारे रु. ३००००/- प्रती KW व जास्तीत जास्त रु. ७८००० मिळतात.
३. PM Surya Ghar Muft Bijli Yojna चा लाभ किती लोकांना मिळेल ?
प्रथमता सुरुवातीच्या १ कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, त्यानंतर सरकार आणखी निधीची उपलब्धता करू शकते.
४. PM Surya Ghar Muft Bijli Yojna साठी कर्ज कुठे मिळेल ?
सर्व राष्ट्रीयकृत बँक या योजनेसाठी कर्जपुरवठा करतात.
५. PM Surya Ghar Muft Bijli Yojna साठी अर्ज कसा करावा ?
या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात.
६. PM Surya Ghar Muft Bijli Yojna या योजनेची सुरुवात कधी करण्यात आली ?
या योजनेची सुरुवात १३ फेब्रुवारी २०२४ ला करण्यात आली.
७. PM Surya Ghar Muft Bijli Yojna या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते ?
या योजनेचा लाभ प्रत्येक भारतीय नागरिक घेऊ शकतो, पण त्यासाठी काही अटी आहेत.
८. PM Surya Ghar Muft Bijli Yojna कशाशी संबंधित आहे ?
ही योजना मोफत वीज मिळावीन्या संबंधी आहे.
आपल्या इतर पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024
Best Scheme For Senior Citizen In 2024, मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र २०२४ …!