India Post GDS Bharti 2024 |भारतीय डाक GDS पदाच्या 40000 जागांसाठी भरती.

India Post GDS Bharti 2024

भारतीय डाक सेवेत GDS (ग्रामीण डाक सेवक ) पदाच्या 40000 जागांसाठी लवकरच नोटिफिकेशन जाहीर केले जाणार आहे. मागील वर्षी Branch Postmaster, Assistant Branch Postmaster व ग्रामीण डाक सेवक अशा तीन पदाकरिता भरती प्रक्रिया राबवली गेली होती. त्यात परीक्षा देखील घेण्यात आली होती. परंतु या वर्षी फक्त ग्रामीण डाक सेवक या पदा करीता भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परंतु या वर्षी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. इयत्ता 10 वी. मिळालेल्या गुणांवरूनच निवड प्रक्रिया राबविली जाईल.

India Post GDS Bharti 2024

ग्रामीण डाक सेवक हे भारतीय डाक विभागातील एक महत्वाचे पद आहे. ग्रामीण डाक सेवक हा पत्र पोहच करणे, पोस्ट ऑफिस चा कारभार सांभाळणे व पोस्टाच्या इतर सेवा नागरीकापर्यंत पोहचवण्याचे काम करतो.

India Post GDS Bharti 2024 ,

गव्हर्निंग बॉडीइंडिया पोस्ट
जॉब पोस्टग्रामीण डाक सेवक (GDS)
पोस्टल सर्कलमहाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, केरळ, पंजाब, ईशान्य राज्ये, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड
एकूण रिक्त जागा40000
पात्रतामॅट्रिक (10वी उत्तीर्ण)
वयोमर्यादा18 ते 40 वर्षे
अर्ज मोडऑनलाइन
पगाररु. 12,000/- ते रु. 14,500/-
अधिकृत वेबसाइटwww.Indiapostgdsonline.gov.in

India Post GDS Bharti 2024 वेळापत्रक

घटनादिनांक
इंडिया पोस्ट जीडीएस भर्ती अधिसूचनाजुलै 2024
नोंदणी सुरूजुलै 2024
नोंदणी ची शेवटची मुदत ऑगस्ट 2024

India Post GDS Bharti 2024 रिक्त पदे

भारतीय डाक सेवेतील ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ची विविध राज्यासाठी विविध रिक्त पदे आहेत, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या राज्यात असणाऱ्या रिक्त पदानुसार अर्ज करावा. तसेच कोणताही उमेदवार कोणत्याही राज्यासाठी अर्ज करू शकतो. पण त्याला तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. याबाबतचे नोटिफिकेशन लवकरच भारतीय डाक विभागाच्या वेबसाइट वर प्रसिद्ध केले जाईल.

पद रिक्त पदे
ग्रामीण डाक सेवक (GDS) ४००००

India Post GDS Bharti पात्रता निकष

India Post GDS Bharti साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.

वय :

अर्जदार चे वय कमीतकमी १८ वर्ष असावे. व अर्जदार हा ४० वर्षा पेक्षा मोठा नसावा. तसेच ओबीसी उमेदवारांना वयात ३ वर्षाची तर SC / ST उमेदवारांना वयात ५ वर्षाची सूट मिळेल. तसेच दिव्यंग उमेदवारांना वयात १० वर्षाची सूट मिळेल. आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता :

अर्जदाराने India Post GDS या पदासाठी असणाऱ्या शैक्षणिक अर्हता पूर्ण केल्या पाहिजे. या पदासाठी अर्जदाराचे कमीतकमी शिक्षण हे १० वी . (SSC) मान्यताप्राप्त बोर्डातून असावे. अर्जदार हा सर्व विषयात उत्तीर्ण असावा.

भाषा ज्ञान :

अर्जदाराला इंग्लिश तसेच राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असने गरजेचे आहे. अर्जदाराला स्थानिक भाषेचे वाचण्याचे, लिहाण्याचे व बोलण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

संगणकाचे ज्ञान :

अर्जदाराला उत्तम प्रकारचे संगणकीय ज्ञान असावे. त्याने संगणकाचा कमीतकमी ६० दिवसांचा सरकारची मान्यताप्राप्त कोर्स पूर्ण केलेला असावा. ज्या अर्जदारांना १० वी मध्ये संगणक हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमात असेल अशा उमेदवारांना वरील अतितुण सूट मिळेल.

सायकल व मोटार सायकल चा अनुभव :

India Post GDS या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सायकल व मोटार सायकल चालवन्याचा अनुभव आवश्यक आहे. कारण ग्रामीण डाक सेवक पदावर असणाऱ्या व्यक्तीला पत्र व मेल डेलीवरी करण्यासाठी बाहेर फिरावे लागते.

India Post GDS अर्ज प्रक्रिया

भारतीय डाक विभाग India Post GDS Recruitment अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदाकरिता भरती प्रक्रिया राबवत आहे. ग्रामीण डाक सेवक हे ग्रामीण भागातील डाक विभागाचे एक महत्वाचे पद आहे. जे पत्रांचे वाटप करणे, पोस्ट ऑफिस चा दैनंदिन कारभार सांभाळणे इ. कामे करतो.

डाक विभागाच्या ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल किंवा भरतीसाठी डाक विभागाने जे काही पोर्टल तयार केलेले असेल त्याला भेट द्यावी लागेल. लॉगिन केल्यानंतर आपली वयक्तिक व शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरावी. अर्जदाराने स्वत:चे स्कॅन केलेले वयक्तिक, शैक्षणिक कागदपत्रे तसेच पासपोर्ट साइज फोटो अपलोड करावे.

ग्रामीण डाक सेवक पदासाठी सेलेक्शन हे मेरिट बेसिस वर केले जाईल. व यासाठी अर्जदारांना १० वी च्या बोर्ड परीक्षेत असणाऱ्या गुणांचा विचार केला जाईल. एकदा मेरिट लिस्ट तयार झाल्यानंतर उमेदवारांचे सिलेक्शन हे त्यांच्या मेरिट मधील रॅंक नुसार होईल.

India Post GDS Bharti 2024 अर्ज फी

प्रवर्ग फी
जनरल व ओबीसी रु. १००/-
एससी, एसटी व स्री फी नाही

अर्ज कसा करावा ?

India Post GDS Bharti 2024 साठी इच्छुक उमेदवारांनी www.Indiapostgdsonline.gov.in या वेबसाइट वर लॉगिन करून रेजिस्टर करून Unique Registration Number मिळवावा.

एक अर्जदाराला एकदाच रजिस्टर करता येईल. त्यामुळे उमेदवाराने अचूक माहिती काळजीपूर्वक भरावी.

Step १ : India Post GDS ऑनलाईन पोर्टल ला भेट द्या.

  • वेब ब्राऊजर उघडून भारतीय डाक विभागाची वेबसाइट उघडून घ्या, India Post GDS पोर्टल ला क्लिक करा.

Step २ : पोर्टल वर रजिस्टर करून घ्या.

  • पोर्टलच्या Registration Section वर जाऊन New Registration वर क्लिक करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात होईल.

Step ३ : बेसिक माहिती भरा.

  • New Registration वर क्लिक केल्यानंतर, अर्जदारणे करावयाचा अर्ज आपल्याला स्क्रीन वर दिसेल.
  • त्यामध्ये दिसणाऱ्या सर्व बाबी ची माहिती अचूक भरा. जसे की अर्जदाराची वयक्तिक माहिती, ईमेल, मोबाइल नंबर, जन्म तारीख इ.
  • दिलेली सर्व माहिती खरी व अचूक आहे याची पडताळणी करा.

Step ४ : कागदपत्रे अपलोड करा.

  • सर्व बेसिक माहिती भरल्यानंतर, पोर्टल मध्ये दिलेल्या ठिकाणी योग्य ते कागदपत्रे अपलोड करा.
  • अपलोड करावी लागणारी कागदपत्रे जसे की, Educational Certificate, Identity Proof, Photographs इ.
  • अपलोड केलेली सर्व कागदपत्रे अचूक आहेत याची खात्री करा.

Step ५ : Review and Submit

  • फॉर्म मध्ये भरलेली सर्व माहिती पुनः एकदा तपासून घ्या.
  • जर सर्व माहिती बरोबर असेल तर Submit/ Register बटन वर क्लिक करून आपले रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला एक Unique Registration Number मिळेल. तो आपल्याकडे सेव करून ठेवा.

Unique Registration Number आपल्याकडे सेव करून ठेवावा. पुढील सर्व प्रक्रिया या त्या नंबर च्या आधारवरच केल्या जातील.

अपलोड करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची साइज :

DocumentFile FormatFile Size
Photographjpg/jpeg50 KB
Signaturejpg/jpeg20 KB
Matriculation Mark sheets/ Class 10 marks Certificatejpg/jpeg200 KB
Date of Birth (DOB) Proofjpg/jpeg200 KB
Computer Certificatejpg/jpeg200 KB
Caste/Community Certificatejpg/jpeg200 KB
Certificate of Disability or PH certificatejpg/jpeg200 KB

India Post GDS Salary :

S.No.GDS PostTRCA for 4 HoursTRCA for 5 Hours
1GDS (ग्रामीण डाक सेवक)INR 12,000/-INR 14,500/-

नोट: GDS पोस्ट साठी निवड झाल्यानंतर TRCA 4 Hour अंतर्गत येणारे हे कमीतकमी वेतन असेल. याव्यतिरिक्त वेगवेगळे Allowances व पगारवाढ नियमानुसार दिली जाईल.

ग्रामीण डाक सेवक काय असतो ? त्याचे काम काय ? पगार किती ? हे बघण्यासाठी खालील विडिओ बघा.

Credit:
Super coaching SSC

FAQ :

India Post GDS पदासाठी वेतन किती असेल ?

भारतीय डाक विभागातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी रु. 12000 (4 तासाच्या सेवेसाठी) , रु. 14500 ( 5 तासाच्या सेवेसाठी). हे कमीतकमी वेतन असेल. याव्यतिरिक्त विविध भत्ते व नियमानुसार पगारवाढ मिळेल.

India Post GDS पदासाठी कोण पात्र असेल ?

India Post GDS पदासाठी मान्यताप्राप्त बोर्ड मधून इ. 10 वी. उत्तीर्ण असलेला कोणताही व्यक्ति पात्र असेल. पण तो व्यक्ति भारतीय नागरिक असावा. तसेच त्याला भाषा व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याने भारतीय डाक सेवेच्या वयाच्या निकषांचे पालन केलेले असावे.

India Post GDS ही सरकारी नोकरी आहे का ?

India Post GDS ही एक केंद्र सरकारची नोकरी असून भारतीय डाक विभागाला अतिशय महत्व प्राप्त आहे. भारतीय डाक सेवा ही Ministry Of Communication च्या अंतर्गत काम करते.

India Post GDS साठी वयोमार्यादा काय असेल ?

ग्रामीण डाक सेवक या पदासाठी वयोमार्यादा ही 18 ते 40 वर्ष इतकी आहे. त्यात ओबीसी साठी 3 वर्षाची सूट तर एससी/ एसटी साठी 5 वर्षाची सूट असेल. दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षाची सूट मिळेल.

India Post GDS साठी कोणत्या प्रकारची परीक्षा असेल ?

India Post GDS साठी कोणत्याही प्रकारची परीक्षा नसेल, उमेदवारांचे सेलेक्शन हे 10 वी. च्या गुणा नुसार होईल. इयत्ता 10 वी च्या गुणानुसार मेरिट लिस्ट लावण्यात येईल, त्यानंतर उमेदवाराच्या रॅंक नुसार त्याची निवड केली जाईल.

भारतीय पोस्टाच्या विविध सेवा बघण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या इतर पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

PM Surya Ghar Muft Bijli Yojna In Marathi 2024|पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना २०२४

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024

Best Scheme For Senior Citizen In 2024, मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र २०२४ …!

Airport Ground Staff Recruitment 2024 , एयरपोर्ट ग्राउंड स्टाफ च्या १०७४ जागांवर भरती..!