Dhruv Rathee Biography In Marathi | ध्रुव राठी यांची माहिती

Dhruv Rathee

ध्रुव राठी हा एक प्रसिद्ध भारतीय Youtuber, Vlogger, Social Activist आहे. त्याचा जन्म 8 ऑक्टोबर 1994 ला हरियानामधील रोहतक या ठिकाणी झाला. ध्रुव राठी मुख्यता त्याच्या YouTube Video साठी प्रसिद्ध आहे. त्याचा ‘Dhruv Rathee’ या नावाने YouTube चॅनेल असून त्यावर सामाजिक व राजकीय बाबींवर आधारित विडियो चे प्रसारण केले जाते. आज पर्यन्त त्याच्या चॅनेल वर 25.05 लाख इतके Subscriber आहेत. तर त्याच्या विडिओ 4.01 अब्ज लोकांनी आजपर्यन्त बघितलेल्या आहेत. यावरूनच त्याच्या प्रसिद्धीचा अंदाज येऊ शकतो.

Dhruv Rathee प्रारंभीक जीवन व शिक्षण

ध्रुव राठी चा जन्म एक हिंदू जाट कुटुंबात हरियाणा राज्यातील रोहतक या ठिकाणी झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण हे हरियाणा मध्येच झाले त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो जर्मनी मध्ये गेला त्याने तेथे Karlsruhe Institute of Technology संस्थेमधून मेकॅनिकल इंगिनियरिंग ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्याच संस्थेतून त्याने Renewable Energy या विषयातून मास्टर डिग्री प्राप्त केली.

Dhruv Rathee करिअर

ध्रुव राठी मुख्यता त्याच्या राजकीय विडिओ साठी ओळखला जातो. ज्यामध्ये विविध फॅक्ट चेक केल्या जातात तर त्यावर तो सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा देतो. काही मॅगजिन नुसार Dhruv Rathee हा राजकीय बाबी पटलावर आणण्यासाठी चॅनेल बनवणारा पहिला Youtuber आहे. त्याने 2013 मध्ये पर्यटन विषयक विडिओ च्या माध्यमातून चॅनेल ची सुरुवात केली व 2013 च्या शेवटी त्याने आपला मोर्चा राजकीय व सामाजिक विषयांकडे वळवला.

ध्रुव राठी त्याच्या विविध विडियो च्या माध्यमातून देशातील अनेक महत्वाच्या विषयांना हात घालत असतो. त्याच्या 2022 Muhammad remarks controversy, 2022 Morbi bridge collapse, 2019 Pulwama attack, 2023 Indian wrestlers’ protest, 2023 Manipur violence अशा अतिशय संवेदनशील विषयावरच्या विडियो ना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळालेली आहे.

सध्याच्या स्थितीला तो भारतातील सर्वात यशस्वी YouTuber आहे. तसेच तो अनेक न्यूज डीबेट मध्ये सहभागी होत असतो.

त्याच्या म्हणण्यानुसार त्याला अण्णा हजारे यांच्या 2011 मध्ये झालेल्या आंदोलणापासून राजकारणात रस वाढला. त्याने 2014 मध्ये पहिल्यांदा मोदी सरकार विरोधात विडिओ बनवला.(BJP Exposed: Lies Behind The Bullshit) त्यावेळी तो विडिओ जवळपास 50000 लोकांनी पहिला.

ध्रुव राठी ने जुलै 2020 मध्ये Dhruv Rathee Vlogs या नावाने आणखी एक YouTube चॅनेलची सुरुवात केली. ज्यामध्ये तो त्याचे आंतरराष्ट्रीय पर्यटन विषयक विडियो प्रसारित करत असतो. अलीकडेच त्याने Netflix सोबत काही शो केलेले आहेत. तसेच त्याने Spotify वर Mahabharat with Dhruv Rathee या नावाने पॉडकास्ट ही केलेले आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये त्याने आणखी एक नवीन चॅनेल ची सुरुवात केली जय मध्ये 30 सेकंदा च्या शॉर्ट विडियो बनवल्या जातात. त्याच्या भाषण शैली ने प्रेक्षक वर्ग त्याच्याकडे आकर्षित होतो. त्याच्या विडियो ह्या अतिशय अभ्यासपूर्ण असतात.

सप्टेंबर 2022 मध्ये त्याला एक वादला सामोरे जावे लागले होते, जेव्हा त्याने पाकिस्तान मध्ये घडत असलेल्या राजकीय उलथा पालथी विषयी विडियो बनवला होता. त्यानानंतर तो विडियो भारतीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालायला YouTube वरुण हटवावा लागला होता.2023 मध्ये ही डाबर या कंपनीने त्याच्यावर कॉपीराइट अंतर्गत खटला कोलकाता न्यायालयात भरला होता.

18 एप्रिल 2024 मध्ये ध्रुव राठी ने त्याच्या नवीन पाच चॅनेल ची घोषणा केली ज्यामध्ये तो त्याच्या विडियो ह्या तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी व कन्नड या प्रादेशिक भाषा मध्ये प्रसारित करणार आहे.

Dhruv Rathee वयक्तिक आयुष्य

ध्रुव राठीला जगभरात फिरण्याचा छंद असून यूट्यूब विडियो बनवणे हा त्याचा व्यवसाय आहे. 2022 मध्ये त्याचा विवाह Julie Lbr हिच्याशी झाला असून ती एक जर्मन नागरिक आहे. 2022 पासून Dhruv Rathee हा ही जर्मनीत च वास्तव्यास आहे.

Dhruv Rathee च्या जीवनाबद्दल ऐका त्याच्या तोंडूनच, खालील विडियो बघा

Dhruv Rathee बद्दल लोकांना माहीत नसलेल्या गोष्टी

  • Dhruv Rathee हा NDTV मध्ये असणारे पत्रकार रविष कुमार यांचा फार मोठा चाहता आहे. NDTV या न्यूज चॅनेल वरील Prime Time या शो मध्ये देखील त्याने भाग घेतलेला आहे.
  • तसेच त्याला आमीर खान, अक्षय कुमार, शाहरुख खान व टॉम क्रुज यांचे चित्रपट बघण्यास आवडतात.
  • Interstellar, The Martian व Secret Life Of Walter Mitty हे त्याच्या आवडत्या चित्रपटापैकी आहेत.
  • Dhruv Rathee त्याच्या दिवसाची सुरुवात हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्सप्रेस व द हिंदू या वृत्तपत्राच्या वाचनापासून होते.
  • फावल्या वेळेत चित्रपट बघणे, फोटोग्राफी, प्रवास इ. गोष्टी तो करतो.
  • तो कोणत्याही प्रकारचे स्मोकिंग अथवा अल्कोहोल सेवन करत नाही.

आपल्या इतर पोस्ट बघण्यासाठी खालील लिंक चेक करा.

Health Tips For Summer| उन्हाळ्यातील खाद्यपदार्थ : काय खावे आणि काय खाऊ नये.

Best WEB series In Hindi ‘पंचायत’ – भारतातील सर्वात आवडती नं. १ हिन्दी वेबसिरीज..!