Best Agri Business Ideas, पशुखाद्य निर्मिती उद्योग कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Best Agri Business Ideas, पशुखाद्य निर्मिती उद्योग कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची अधिकतम लोकसंख्या अजूनही खेड्यातच राहते. भारताची अर्थव्यवस्था शेती व शेतीपूरक व्यवसायावरच अवलंबून आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असून, अनेक शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करतात. पशुपालन, कुक्कुटपालन, शेळ्या – मेंढ्या पालन, शेतीप्रक्रिया उद्योग या प्रकारचे अनेक जोडधंदे शेतकऱ्याद्वारे केले जातात.

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड नंतर सर्वात जास्त दुधाचे उत्पादन असणारा देश हा भारत आहे. दूध व दुधावर प्रक्रिया करून तयार केलेली उत्पादने जसे कि लस्सी, श्रीखंड, घी, पास्चराइड मिल्क, पनीर यांना बाजारपेठेत खूप मागणी आहे. भारतात बऱ्यापैकी लोकसंख्या हि शाकाहारी आहे, शाकाहारात दूध हा मुख्य अन्नपदार्थ आहे. १३५ कोटी लोकसंख्येला पुरेल इतके दुग्धोत्पादन भारतात केले जाते. दुधाचे जास्तीत जास्त उत्पादन व्हावे यासाठी गाय व म्हैस पालन केले जाते, दुधाचे उत्पन्न वाढावे यासाठी जनावरांना सकस आहार देणे खूप गरजेचे असते. या आधुनिक युगात जनावरांचे गोठे अतिशय आधुनिक पद्धतीने बनवले जाऊ लागले आहेत.जनावरांच्या अन्नद्रव्याच्या पूर्ततेसाठी त्यांना पशुआहार दिला जातो. पशुखाद्य तयार करण्याचा व्यवसाय सध्या खूप प्रगतीपथावर आहे आणि त्याला भविष्यातही चांगल्या प्रकारची मागणी असेल. जनावरांप्रमाणेच कोंबड्यांसाठी खाद्य, मच्छीपालनासाठी खाद्य तयार करण्याचा व्यवसायही सोबत केला जाऊ शकतो. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो.अंडे उत्पादनासाठी कुक्कुक्कुटपालन व्यवसाय हि अनेक गावांमध्ये केला जातो.

बेरोजगारीवर मात करण्यासाठी गावांमधील अनेक युवक हे गायपालन, कुक्कुटपालन अशा व्यवसायांकडे वळले आहेत. त्यांना पशुपक्षी खाद्याची चांगल्या प्रमाणात गरज असते. भारतातील बरीच लोकसंख्या मांसाहार करते, अंडे व अंड्यापासून बनवलेल्या केक ला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मुंबईसारख्या मोठ्या शहरांना मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या दूध, मांस व अंड्याची पूर्तता ही ग्रामीण भागातूनच केली जाते. गायीपासून चांगल्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेण्यासाठी त्यांना सकस असा आहार पुरवणे गरजेचे असते. त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने फॉर्म्युला तयार केलेले खाद्य द्यावे लागते. नवउद्योजक तरुणांनी बाजारपेठेचया मागणीचा व्यवस्थितपणे अभ्यास करून प्राथमिक स्वरूपात पशुखाद्य निर्मिती प्रकल्प सुरू केला तर निश्चितच चांगला नफा होईल यात शंका नाही.

पशुखाद्य विक्री कुठे करू शकतो ?
Best Agri Business Ideas


१. पशुखाद्य विक्रीसाठी ग्रामीण व शहरी भागात होलसेल पशुखाद्य विक्रेते असतात. आपण त्यांना पशुखाद्य देऊ शकतो.
२. दूध संघ, दूध डेअरी , पोल्ट्री फार्म, शेतकरी, गाय व म्हैस गोठा असणाऱ्या मोठ्या दूध उत्पादकांना आपण विक्री करू शकतो.
पशुखाद्य निर्मितीचा फॉर्म्युला त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीकडून तयार करून घ्यावा. कारण पशुखाद्याचा परिणाम दोन ते तीन दिवसात दिसून येतो. फॉर्म्युला चांगला बनला तर दूध उत्पादन वाढेल व आपल्या पशुखाद्याला मागणी वाढेल.

पशुखाद्य निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल :
Best Agri Business Ideas


मका, हरभरा, गहू, ज्वारी, भाताची तुस, सोय डीवोसि, व्हेटरनरी supplements, मिनरल मिकचर इत्यादि.
पशुखाद्य निर्मितीसाठी लागणारी मशिनरी:
Hammer Mill, इलेक्ट्रिक मोटर, ग्राईनडेर, मिक्सर, ताडपत्री इत्यादि.

पशुखाद्य निर्मितीसाठी लागणारया मशिनरी कुठे मिळतील ?

  1. Keyul Enterprise, Address: BGTA Narmada B-6 premises co-op society, Bldg no 6 ,Office no 317, 3rd Floor, Truck Terminals , Wadala East,Mumbai – 400037, Maharashtra, India.
  2. Khare Agro-Mech Industries Pvt. Ltd. Address: B-7 / 14, M.I.D.C., Miraj – 416 410, Dist. : Sangli, Maharashtra, India.
  3. Lark Engineering. Address: I.T.I, Sasoli Road, Jagadhri Workshop Yamuna Nagar, Haryana-135002. India.
  4. Chaitanya Industries. Address: E 198, MIDC, Baramati, Baramati, Maharashtra, 413133, India.
  5. CREMACH. Address: 448 GIDC Makarpura, Vadodara – 390 010, Gujarat, India.

व्यवसाय कर्जासाठी सरकारी योजना :

१. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना
या योजनेचा मुख्य उद्देश हा लघु उद्योग व व्यवसायासाठी , त्यांचा विकास व विस्तार व्हावा यासाठी कर्ज पुरवठा केला जातो.
कर्जपुरवठा १५००० रुपयांपासून १०००००० रुपायपर्यंत केला जातो.
परतफेडईचा कालावधी तीन ते पाच वर्षापर्यंतचा असतो.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा.

२. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (PMEGP)
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (PMEGP) ही योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली योजना आहे. भारतातील तरुण बेरोजगारांना या योजनेअंतर्गत १० लाख ते २५ लाख रुपायपर्यंतचे कर्ज दिले जाते.
देशातील सर्व तरुणांना स्वता चा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज प्राप्त करून देणे, जेणेकरून त्यांना स्वता चा रोजगार प्राप्त होईल, स्वता चे हक्काचे कामईचे साधन उपलब्ध होईल. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (PMEGP) संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.

Cattle Feed Manufacturing Business Video

Credit: Chawadi Group

इतर पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

RTE Admission Maharashtra 2024-25. आर.टी.ई. प्रवेश २०२४-२५ .

(2024) महाराष्ट्र लेक लाडकी योजना, Maharashtra Lek Ladaki Yojana 2024.

No.1 Health Tips For Summer, उन्हाळ्यातील खाद्यपदार्थ : काय खावे आणि काय खाऊ नये.